एखादा जासूस सांगू शकतो, या चित्रात तिसरा नाविक लपलाय कुठे?

| Updated on: May 09, 2023 | 11:03 AM

ही कोडी, चित्र सोडवताना आणि गोष्टी समजून घेताना तुमच्या क्षमतेला आव्हान मिळते. या फोटोंची खासियत म्हणजे ते युजरचं लक्ष वेधून घेतात. इतकंच नाही तर काही काळ त्या व्यक्तीचं लक्ष त्याच चित्राकडे केंद्रित राहतं. संशोधनानुसार, ऑप्टिकल भ्रम आपल्याला मानवी मेंदूचे कार्य समजून घेण्यास मदत करू शकतात.

एखादा जासूस सांगू शकतो, या चित्रात तिसरा नाविक लपलाय कुठे?
Find the third boatman
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: ऑप्टिकल इल्युजनची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होतात ज्यामुळे तुम्ही गोंधळून जाता. जाणारच, कारण हे एक प्रकारचे कोडे असते. ही कोडी, चित्र सोडवताना आणि गोष्टी समजून घेताना तुमच्या क्षमतेला आव्हान मिळते. या फोटोंची खासियत म्हणजे ते युजरचं लक्ष वेधून घेतात. इतकंच नाही तर काही काळ त्या व्यक्तीचं लक्ष त्याच चित्राकडे केंद्रित राहतं. संशोधनानुसार, ऑप्टिकल भ्रम आपल्याला मानवी मेंदूचे कार्य समजून घेण्यास मदत करू शकतात.

तुम्ही तिसऱ्या नाविकाचा चेहरा पाहिला का?

वाढत्या वयाबरोबर आपला मेंदू कमी होण्याऐवजी वेगवान आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय असावा असे आपल्याला वाटते का? जर असे असेल तर आपण यापुढे असे कोडे सोडवत राहिले पाहिजे, कारण यामुळे तुमचे डोके, निरीक्षण कौशल्य अधिक तीक्ष्ण होते. आपण चांगले निरीक्षण कौशल्य असलेले व्यक्ती आहात का? जर असाल तर तलावाच्या ठिकाणी लपलेल्या तिसऱ्या खलाशाला ९ सेकंदात ओळखा. या फोटोत तुम्हाला दोन खलाशी बोट चालवताना दिसतआहेत, पण तुम्हाला तिसरा खलाशी दिसतोय का? नसेल तर काळजीपूर्वक बघा कारण तुम्हाला ते फक्त 9 सेकंदात ओळखायचे आहे.

here is the answer

आपल्याकडे आहेत फक्त 9 सेकंद

शेअर केलेल्या फोटोमध्ये एका सुंदर तलावाचे दृश्य दिसत आहे, ज्यामध्ये काही महिला आणि पुरुष बोटिंग करताना दिसत आहेत. यात आपल्याला दिसणाऱ्या खलाशांऐवजी दृश्यात आणखी एक लपलेला खलाशी आहे. हा खलाशी आपल्याला 9 सेकंदात शोधून दाखवायचा आहे. तुमच्या निरीक्षण कौशल्याची ही उत्तम परीक्षा आहे. चित्राच्या डाव्या बाजूला मागच्या बोटीच्या थोड्या पुढे तिसरा खलाशी दिसत आहे. प्रथमदर्शनी वाहत्या पाण्यासारखे वाटते, पण बारकाईने पाहिले तर खलाशाच्या चेहऱ्याची रूपरेषा दिसते.