मुंबई: आम्ही पुन्हा एकदा एक नवं कोरं ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलोय. किचकट असणाऱ्या ऑप्टिकल भ्रमात तुम्हाला नेहमी काही ना काही शोधायचं असतं. यात अनेक प्रकार असतात. कधी या चित्रात तुम्हाला एखादा अंक शोधायचा असतो, कधी एखादा शब्द तर कधी एखादा लपलेला चेहरा शोधायचा असतो. हे सगळेच प्रकार खूप चॅलेंजिंग असतात. ऑप्टिकल भ्रमात प्रथमदर्शनी जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही. सत्य काहीतरी वेगळंच असतं आणि म्हणूनच याला भ्रम म्हटलं जातं. लहानपणी आपण कोडी सोडवायचो ती तोंडी कोडी असायची. त्यात समोरचा आपल्याला कोडी घालायचा आणि आपण ती कोडी तोंडीच सोडवायचो. आता हीच कोडी ऑप्टिकल इल्युजन आहेत. ऑप्टिकल इल्युजन ऑनलाइन असतात.
हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला फ्लेमिंगो पक्षी दिसतील. या पक्षांमध्ये तुम्हाला एक हसरी मुलगी शोधायची आहे. चित्र बघून आधी तुम्ही गोंधळून जाल. पण याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला डोकं शांत ठेवायची आणि मन एकाग्र करायची गरज आहे. हे पक्षी इतके सुंदर आहेत की तुम्ही यात तुम्हाला काय शोधायचं आहे ते देखील विसरून जाल. पण हीच ऑप्टिकल भ्रमाची खासियत असते. यात तुम्ही खूप भटकता. आता तरी तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का?
ऑप्टिकल भ्रमात उत्तर शोधताना तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की तुम्हाला शोधायचं काय आहे. आम्ही सांगतो उत्तर कसं शोधायचं. या चित्राकडे नीट निरखून बघा. डावीकडून उजवीकडे बघा, वरून-खाली बघा. अट एकच आहे की याचं उत्तर लवकरात लवकर शोधायचं आहे. तुम्ही पटापट एक एक फ्लेमिंगो बघितला की एखाद्या तरी पक्षाच्या मागे तुम्हाला ही मुलगी दिसेल. तुमचं निरीक्षण चांगलं असल्यास तुम्हाला याचं उत्तर नक्की सापडेल. तुम्हाला याचं उत्तर दिसलं असेल तर अभिनंदन! तुम्ही खरंच खूप हुशार आहात. जर तुम्हाला याचं उत्तर दिसलं नसेल तर काळजी करू नका आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.