चित्रात खूप सामर्थ्य असतं असं म्हणतात. चित्र वेगवेगळ्या माणसासाठी वेगवेगळं असतं. कधी कुणाला एखादा फोटो , पेंटिंग किंवा चित्र बघून काय वाटेल तर कधी कुणाला काय. ऑप्टिकल भ्रम (Optical Illusion) म्हणजे ऑप्टिकल इल्युजन हा एक वर्ग वेगळा आहे. हे तुमच्या मेंदूच्या आतील कोपऱ्यांची चाचणी घेते. या चित्राकडे आपण जसं पाहायला लागतो तसे हे ठिपके फिरायला लागतात तुमच्या लक्षात येईल आणि या प्रकारालाच ऑप्टिकल भ्रम म्हटलं जातं. ऑप्टिकल इल्यूजन खूप मजेशीर असतात. अनेक वेळा लोकं हा फोटो बघताना गोंधळून जातात, अडकून जातात. बरेचदा हे इतकं अवघड वाटतं की लोकं त्यावर उपाय शोधू शकत नाहीत, तर कित्येकदा लोकं सहज ही इमेज (Optical Illusion Image) सोडवून टाकतात. तुम्हालाही तुमची बुद्ध्यांक पातळीची चाचणी करायची असेल, तर या ऑप्टिकल इल्युजनवर बारकाईने नजर टाका. फोटोंच्या मध्ये बघितल्यावर त्यात तुम्हाला एक रंग दिसेल. हे रंग आपला बुद्ध्यांक पातळी (IQ Level) समजून घेण्यात मदत करू शकतात. जाणून घ्या कसे…
चित्राच्या मधोमध थोडा वेळ नजर टाकली तर तुम्हाला दोन रंग दिसण्याची शक्यता जास्त असते. हे दोन रंग आहेत – निळा आणि लाल. तसे पाहिले तर प्रत्येकाच्या आत एक प्रतिभा दडलेली असते. परंतु सर्व श्रेणी आणि तज्ञ भिन्न आहेत. ‘माइंड्स जर्नल’च्या मते निळा रंग आधी पाहिला तर तुम्ही आकलनाचे प्रतिभावान आणि लाल रंग आधी दिसला तर तर्कशास्त्राचे प्रतिभावान आहात.
जर तुम्हाला निळा रंग आधी दिसला तर तुमच्या मेंदूच्या वेव्हज ची फ्रिक्वेन्सी 100-120 हर्ट्ज दरम्यान आहे.
म्हणजेच सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर निळा रंग दिसल्यास तुमच्याकडे मानसिक स्पष्टता आहे आणि तुम्हाला जीवनातील संकल्पना चांगल्या प्रकारे समजतात. त्यामुळे कठीण निर्णय घेण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. जर तुम्हाला सर्वात आधी दिसला तर लाल रंग म्हणजे तुम्ही तर्कशास्त्राचे प्रतिभावान आहात. म्हणजेच तुमच्या मेंदूच्या वेव्हजची फ्रिक्वेन्सी 150-180 हर्ट्ज दरम्यान असते. तुमच्याकडे सरासरीपेक्षा जास्त बुद्धिमत्ता आहे आणि समस्या सोडवणे देखील तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाही. तुम्ही ते सहज करू शकता.
निळ्या रंगाची दिसणारी व्यक्ती उत्तम कार्यकर्ता आणि चांगली टीम प्लेअर आहे, हे या गमतीशीर ऑप्टिकल इल्यूजनवरून दिसून येतं. इतर लोक अशा लोकांवर विश्वास ठेवतात. जर तुम्ही लाल दिसणाऱ्या लोकांपैकी एक असाल, तर लोक त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीत तुमची वाट पाहतात. इतकंच नाही तर इतर लोकांवर तुमचा खूप प्रभाव आहे.