मुंबई: ऑप्टिकल इल्युजनचे अनेक प्रकार असतात. यात कधी तुम्हाला एखादी लपलेली वस्तू शोधायची असते. कधी तुम्हाला चुकलेला शब्द ओळखायचा असतो, कधी चित्रांमधील फरक ओळखायचा असतो. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम आणि म्हणजेच एक प्रकारचे कोडे. लहानपणी आपण कोडे सोडवायचो, यात जो लवकर कोडे सोडवेल तोच खरा हुशार असं देखील म्हटलं जायचं. हो ना? आताही काहीसा असाच प्रकार आहे. आताही जर तुम्हाला ऑप्टिकल इल्युजनचे उत्तर सापडले तर तुमच्या इतके हुशार कुणीच नाही. चित्र बघून तुम्हाला यात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर झटक्यात द्यायचं असतं.
एका अभ्यासानुसार ऑप्टिकल इल्युजनचे चित्र माणसाचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते सांगतात. यात चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला जे सगळ्यात आधी दिसतं त्यावर तुमचं व्यक्तिमत्त्व ठरतं. त्यामुळे बरेचदा आपल्यालाही असे चित्र दिसतात ज्यात आपल्याला विचारलेलं असतं की सांगा तुम्हाला यात आधी काय दिसतंय. आपणही त्या चित्राकडे नीट बघतो आणि आधी काय दिसलं ते सांगतो. ऑप्टिकल इल्युजन व्यक्तीला त्याच्याबद्दल बरंच काही सांगतं.
आता हे चित्र नीट बघा, या चित्रात तुम्हाला आधी डोंगर दिसतोय की चेहरा? जर तुम्ही आधी डोंगर पाहिला तर तुम्ही खूप शांत आणि समाधानी आहात. इन्ट्रोव्हर्ट आहात. तुम्ही लोकांना कधीकधी आळशी वाटू शकता. जर तुम्हाला आधी चेहरा दिसला असेल तर तुम्हाला आयुष्यात थ्रिल आवडतो. तुम्ही सतत नावीन्याच्या शोधात असता. तुम्ही नेहमीच लोकांनी वेढलेले असता. तुमच्या मनात नेहमी जिंकण्याची भावना असते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी लोकं हवी आहेत जी तुम्हाला स्वीकारतील.