मुंबई: अनेकदा समोरच्या ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्समध्ये दोन वेगवेगळे शब्द सारखेच दिसतात आणि आपण गोंधळून जातो. या चित्रात असंच काहीसं आहे. फक्त एक फरक आहे जो तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही जर तो शोधलात तर तुमच्या इतकं हुशार कुणीच नाही. यात फक्त एक अक्षर वेगळं आहे जे तुम्हाला अत्यंत कमी वेळात शोधायचं आहे. जर तुम्ही हे 5 सेकंदात शोधले तर तुमचे निरीक्षण कौशल्य खूप चांगले आहे असं म्हणायला हरकत नाही. हा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
खरं तर एलईटी आणि जेट मध्ये एकाच अक्षराचा फरक आहे. पण दोघांच्या अर्थात बराच फरक आहे. ऑप्टिकल इल्युजन्स सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत. हे एक प्रकारचे कोडे आहे. आपण लहानपणी तोंडी कोडी सोडवायचो आता हीच कोडी डिजिटल स्वरूपात आलीत. कधी यात चित्र नीट बघून फरक सांगायचा असतो तर कधी यात काय लपलंय ते सांगायचं असतं.
या चित्रात एका जागी एल ऐवजी जे लिहिण्यात आलंय आणि हाच या चित्रातला फरक आहे. वरवर जर या चित्राकडे पाहिलं तर हा फरक दिसणार नाही, पण नीट पाहिलं तर सगळं जेईटी हा शब्द तुम्हाला दिसून येईल. या ऑप्टिकल इल्युजनमध्ये हाच जेईटी शब्द कुठे लिहिला आहे याबद्दल विचारण्यात आलं आहे.
आपल्याला अद्याप जेट हा शब्द सापडला नसेल तर पुन्हा एकदा चित्राकडे नीट बघा. नीट पाहिलं तर शेवटच्या दुसऱ्या ओळीत खालपासून वरपर्यंत जाताना चौथा शब्द जेईटी लिहिलेला आहे. या शब्दात ल ऐवजी ज असे लिहिले आहे. आता तुम्हाला ते किती लवकर सापडले आहे ते शोधा. आम्ही खाली उत्तर देतोय.