एका नव्या प्रकरणामुळे त्यांच्या एका माजी क्रिकेटपटूला प्रचंड ट्रोल केले जात आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एक अशी घटना घडली जी प्रचंड व्हायरल होतीये. आम्ही बाजिद खानबद्दल आम्ही बोलत आहोत , ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बाजिद खानने अशी चूक केलीये की ज्याची चर्चा आता सगळीकडेच आहे. लाइव्ह मॅचमध्ये बाजीद खानने न्यूझीलंडच्या माजी खेळाडूचे नाव घेण्याऐवजी पॉर्न स्टारचे नाव घेतले.
बाजिद खानला डॅनी मॉरिसनचं नाव घ्यायचं होतं पण त्या ऐवजी त्याने डॅनी डॅनियल्सचं नाव घेतलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने शेअर केले जातायत.
@bazidkhan81 legend https://t.co/EIrt0GP0Tb
— Malik Muhammad Naqi (@MalikMNaqi) January 5, 2023
ज्या पॉर्न स्टारचं नाव चुकून घेण्यात आलं त्या पॉर्न स्टारने डॅनी डेनियलने आणखीनच गंमत केली. हा व्हायरल व्हिडिओ शेअर करत मला क्रिकेटच्या संघात प्रवेश द्या अशी मजेशीर मागणी केलीये.
डॅनी डेनियल एक अमेरिकन पॉर्न स्टार आहे. पाकिस्तानी कमेंटेटरने तिचे नाव घेतल्याचा व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तिनेही या घटनेची चांगलीच मजा घेतली. डॅनी डॅनियल्सने उत्तर देत ‘मला संघाच्या प्रशिक्षकपदी घ्या’ असे लिहिले.
Put me in coach! ??? https://t.co/sc5ciwTN53
— Dani Daniels (@akaDaniDaniels) January 4, 2023
बाजिद खानने हे काम जाणूनबुजून केले नाही. चुकून डॅनी मॉरिसन ऐवजी डॅनी डॅनियल्स हे नाव तोंडातून बाहेर पडले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानच्या या खेळाडूला प्रचंड ट्रोल केले जात आहे.