Video: कतरिना कैफसोबत रिलेशनशिप बनवणार? पाकिस्तान सिव्हील परीक्षेच्या मॉक टेस्टमध्ये प्रश्न, उत्तर असे आले की…

| Updated on: Sep 01, 2024 | 6:00 PM

मॉक मुलाखतीत भारतीय बॉलीवूड अभिनेत्री कॅतरिना कैफसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मुलाखत घेणाऱ्याने विचारने कॅतरिनामध्ये तुम्हाला जास्त काय आवडते. मुलाखत देणाऱ्याने उमेदवाराने घाबरत घाबरत म्हटले तिचे डोळे आवडतात. त्यानंतर कॅतरिनासंदर्भातील प्रश्नांची मालिका येथेच संपली नाही.

Video: कतरिना कैफसोबत रिलेशनशिप बनवणार? पाकिस्तान सिव्हील परीक्षेच्या मॉक टेस्टमध्ये प्रश्न, उत्तर असे आले की...
पाकिस्तानमधील सिव्हील सर्व्हीस परीक्षेची तयारी
Follow us on

कोणत्याही देशाची सिव्हील सर्व्हीस सेवेची परीक्षा अवघड असते. लाखो लोक ही परीक्षा देतात. परंतु निवड मोजक्या उमेदवारांची होते. पाकिस्तानमधील सिव्हील सर्व्हीस परीक्षेची तयारी करणाऱ्या एका उमेदवाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मॉक टेस्टचा हा व्हिडिओ सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. मॉक मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने कॅतरिना कैफसंदर्भात प्रश्न विचारला आहे. मॉक मुलाखती कोचिंग संस्थांकडून घेतल्या जातात.

काय होतो तो प्रश्न

मॉक मुलाखतीत भारतीय बॉलीवूड अभिनेत्री कॅतरिना कैफसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मुलाखत घेणाऱ्याने विचारने कॅतरिनामध्ये तुम्हाला जास्त काय आवडते. मुलाखत देणाऱ्याने उमेदवाराने घाबरत घाबरत म्हटले तिचे डोळे आवडतात. त्यानंतर कॅतरिनासंदर्भातील प्रश्नांची मालिका येथेच संपली नाही. सर्वाधिक आवडणारी भारतीय अभिनेत्री कोण? असा दुसरा प्रश्न विचारला. त्या उमेदवाराने पुन्हा कॅतरिना कैफ असे उत्तर दिले. त्यानंतर मुलाखत घेणारा व्यक्ती एक परिस्थिती निर्माण करुन सांगतात अन् उत्तर विचारतात. त्यानुसार, “भारत पाकिस्तानवर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत आहे. कॅतरिनाजवळ ते रोखण्यासंदर्भात माहिती आहे. तुमचे काम तिच्याकडून ती माहिती मिळवणे आहे. त्यासाठी एकमात्र पर्याय म्हणजे तिच्यासोबत रिलेशनशिप बनवणे आहे. तुम्ही काय करणार”

हे सुद्धा वाचा

मुलाखत देणारा उमेदवार उत्तर देतो, ” देशाचा सुरक्षेसंबंधित विषय आहे. त्यामुळे मला ते करावे लागणार आहे.” त्यावर मुलाखत घेणारा व्यक्ती आश्चर्यचकीत झाला. तो पुढे म्हणाले, ही परिस्थिती अफगाणिस्तानमध्ये आहे. एक पुरुष रिलेशनशिप करण्याचे म्हणत असेल तर काय करणार? त्यावर मुलाखत देणारा विचारतो, कोणत्या पद्धतीचे रिलेशनशिप. त्यानंतर मुलाखत घेणारा व्यक्ती त्याच्यावर रागवतो.

असे उत्तर चुकीचे

व्हिडिओच्या शेवटी, मुलाखत घेणारा व्यक्ती फीडबॅक देतो आणि म्हणतो की, तुम्ही देशभक्ती दाखवण्यासाठी हे सांगितले. पण हे सांगता येत नाही. नाहीतर अडकून पडाल. या मुलाखतीमुळे पाकिस्तानातील अनेक लोक संतापलेले दिसत आहे. इंस्टाग्राम यूजर डॉ. हसन बिलाल यांनी लिहिले की, ही मुलाखती अपलोड करू नका, कारण त्यामुळे आमचा बौद्धिक कमकुवतपणा समोर येत आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ही मुलाखत एक विनोद आहे.’