नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडलीये वायव्य पाकिस्तानातील मानसेहरा शहरात एका 110 वर्षीय व्यक्तीने 55 वर्षीय महिलेशी लग्न केले. खैबर पख्तूनख्वा मध्ये एका 110 वर्षीय व्यक्तीने चौथ्यांदा लग्न केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अब्दुल हन्नान स्वाति यांनी एका 55 वर्षीय महिलेशी लग्न केले. विशेष म्हणजे नवरदेवाच्या कुटुंबात 84 सदस्य आहेत. त्यांना 12 मुले आणि अनेक पुतणी-पुतणे आहेत. त्यांचा मोठा मुलगा 70 वर्षांचा आहे. पाकिस्तानातील मानसेहरा जिल्ह्यातील एका मशिदीत त्यांनी मेहर पाच हजार पाकिस्तानी रुपयांसोबत लग्न केले.
अब्दुल हनान स्वाति हा मानसेहरा येथील ग्राथली जुरी भागातील रहिवासी असून त्याचे हे चौथे लग्न आहे. स्वाति यांचा मोठा मुलगा 70 वर्षांचा असून त्यांच्या संपूर्ण कुटुंबात 84 सदस्य आहेत. स्थानिक मशिदीत हा निकाह सोहळा पार पडला, ज्यात ‘हक मेहेर’ म्हणून पाच हजार रुपये निश्चित करण्यात आले. अब्दुल हनान यांच्या वालिमा सोहळ्याला अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये 70 वर्षीय नवरदेव पत्नीच्या हातात गुलाबाचे ब्रेसलेट घालत आहे.
या घटनेच्या काही दिवस आधी एका 95 वर्षीय व्यक्तीने दुसरे लग्न केले होते. याच जिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीने दुसरे लग्न केल्यानंतर काही दिवसांनी हा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह प्रचंड चर्चेत आहे. व्हिडीओ देखील व्हायरल होतोय.