पाकिस्तानातली एक घटना जबरदस्त व्हायरल होतीये. एका 18 वर्षीय तरुणीने 55 वर्षीय माणसाशी प्रेमविवाह (Pakistan Love Marriage) केलाय. असे खरं तर आपण अनेक किस्से ऐकतो, पण हा प्रेमविवाह बॉबी देओल मुळे झालाय. आता तुम्ही म्हणाल कसं? बॉबी देओलचे गाणे ऐकून हे जोडपं एकमेकांच्या प्रेमात पडलंय. गाण्यांचा (Bollywood Songs) प्रभाव पाहिला का मंडळी? गाण्यांमुळे लोकांनी आपलं वय रंग रूप सगळं विसरावं आणि प्रेमात पडावं अशी ती गाण्यांची ताकद. ही 18 वर्षीय तरुणी उत्तम गायिका आहे आणि ती बॉबी देओलचे (Bobby Deol) गाणे गात असते. 55 वर्षीय या व्यक्तीलासुद्धा तीच गाणी आवडत होती. ही गाणी ऐकण्यासाठी तो त्या तरुणीच्या घरी जाऊ लागला आणि बघता बघता हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आता पाकिस्तानात फक्त याच प्रेमविवाहाची चर्चा आहे.
म्हणतात प्रेमाला वय, जात किंवा वर्ण, वय कळत नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे 18 वर्षांच्या मुलीने नुकतेच पाकिस्तानात एका 55 वर्षीय व्यक्तीशी लग्न केले आणि दोघांच्याही कुटुंबीयांना धक्का बसला. विशेष म्हणजे संगीत आणि विशेषत: बॉबी देओलच्या गाण्यांनी हे कपल अधिक जवळ आणलं. रिपोर्ट्सनुसार, 18 वर्षीय मुस्कान फारूकच्या घराजवळ राहत होती. मुस्कानला संगीताची आवड होती आणि ती खूप छान गात होती. फारूकला तिची गाणी खूप आवडली. हळूहळू फारूक मुस्कानच्या घरी जाऊ लागला. फारूकला ती आवडते हे मुस्कानच्या लक्षात आल्यावर त्याने बॉबी देओलच्या बादलमधील गाणे ‘ना मिलो हम से ज्यादा’ गाण्यासारखे संकेत तिला देण्यास सुरुवात केली.
फारूख म्हणाले की, मुस्कानने प्रथम आपल्यावरील प्रेम व्यक्त केले. मुस्कानच्या गायकीने मी खूप प्रभावित झालो होतो आणि त्यामुळेच तिला आवडू लागला, असे फारूख यांनी सांगितले. दरम्यान, फारूख यांच्या बोलण्याच्या शैलीने प्रभावित झाल्याचे मुस्कानने सांगितले. दोघांनी एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केलं, पण त्यांच्या घरच्यांनी आणि मित्रपरिवारानं त्यांच्या नात्याला विरोध केला. मात्र, दोघांनीही आई-वडील आणि समाजाविरोधात लग्न केलं.