मुंबई : देशाचे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची लोकप्रियता पाकिस्तानातही होती. पाकिस्तानातील अनेक लोक त्यांच्यावर प्रेम करायचे. त्यामुळेच पाकिस्तानची प्रसिद्ध अँकर बेगम नवाजिश अली हीने 2008 मध्ये दिल्लीत येऊन लालू प्रसाद यादव यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी लालू प्रसाद यादव यांची पाकिस्तानात किती लोकप्रियता आहे याबाबत सांगितलं होतं. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांनी म्हटलं होतं की, लालू यांनी पाकिस्तानातही निवडणूक लढली तर ते निवडून येतील, अशी माहिती बेगम नवाजिश अली हीने दिली होती (Begum Nawazish Ali interviewed Lalu Prasad Yadav).
‘मुलाखतीदरम्यान लालू फ्लर्ट करायला लागले’
या मुलाखती नंतर नवाजिश अली हीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’सोबत बातचित केली होती. मुलाखतीदरम्यान लालू फ्लर्ट करायला लागले होते, असं नवाजिशने सांगितलं होतं. नवाजिश अलीचा त्यावेळी प्रसिद्ध कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचा नाव ‘लेट नाईट विथ नवाजिश अली’ असं होतं. या कार्यक्रमात नवाजिश मुलाखतीत आलेल्या मान्यवरांसोबत फ्लर्ट करायची. पण त्यांनी लालूंसोबत तसं करु नये, अशी सूचना देण्यात आली होती.
“दरम्यान, लालू यांनी आपल्या आधीच्या मुलाखती बघितल्या असतील त्यामुळे मला कंफर्टेबल वाटावं म्हणून लालू फ्लर्ट करत असावेत”, असं नवाजिशने सांगितलं होतं (Begum Nawazish Ali interviewed Lalu Prasad Yadav).
लालू नवाजिश अलीसोबत फ्लर्ट करताना काय म्हणाले होते?
नवाजिशने सांगितल्यानुसारल लालू म्हणाले होते, “आज पहिल्यांदा तुम्हाला भेटलोय. माझ्यासोबत चला तुम्हाला संपूर्ण भारत फिरवतो. रस्त्यात तुम्हाला काही ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटही दाखवतो.”
मी फक्त तुमचं नाव ऐकून मुलाखतीसाठी तयार झालो. नाहीतर पाकिस्तानच्या कोणत्याच चॅनलला मी मुलाखत देणार नाही, असं लालू म्हणाले होते, असंही नवाजिश यांनी सांगितलं होतं.
हेही वाचा : दुर्घटनेत हात-पाय गेले, नियतीने साथ सोडली, पण ‘तिने’ नाही, डोळ्यांमध्ये पाणी आणणारी प्रेम कहाणी