लाहोर : एखादी व्यक्ती भीख मागताना दिसली की, त्या बद्दल एक सर्वसामान्य धारणा असते, ही भिखारी आहे, गरीबीमुळे भीख मागतोय. रस्त्यावर तुम्हाला अनेकदा काहीजण भीख मागताना दिसतात. तुम्ही त्यांना गरीब, निराधार समजून पैशाची मदत करता. कारण कुठल्याही गरजवंताला मदत करण हे पुण्यकार्य आहे. पण असेही काही भिखारी आहेत, जे आपली वाईट परिस्थिती दाखवून आपल्या भावनांशी खेळततात. तुम्हाला खोट सांगून तुमच्याकडून पैसे घेतात.
तुम्ही थोडेशे सर्तक राहिलात, तर तुम्हाला चूक आणि बरोबर यातील फरक आरामात लक्षात येईल. सध्याच्या काळात ही गरज आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल, तर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहा. यात मुलगी सांगते, की कशी ती लोकांना फसवून भीख मागते. याच भीखेतून मिळणाऱ्या कमाईच्या जोरावर मलेशियात तिच्या नावार दोन फ्लॅट्स आहेत. एक कार आणि स्वत:चा बिझनेस आहे.
ती मुलगी खर का बोलली?
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्या महिलेच नाव लाइबा आहे. 1 मिनिट 25 सेकंदाच्या या व्हिडिओत मुलगी सांगते की, मागच्या पाच वर्षात तिने भीख मागून कसे पैसे कमावले. त्या मुलीने कबूल केलं की, भीख मागून आत तिच्याकडे श्रीमंती आली आहे. तिला विचारलं की, तू इतक खरं का बोलत आहेस?. त्यावर तिने सांगिलं की, सत्य लपवता येऊ शकत नाही. लोक तुला इतकी भीख कशी द्यायचे? त्यावर ती म्हणाला की, ‘मी लोकांना माझी खोटी कथा सांगायचे, ते मला पैसे द्यायचे’
Entrepreneurship in the neighbouring country! pic.twitter.com/zLkjvGFKug
— Shah Faesal (@shahfaesal) November 24, 2023
‘शेजारी देशातील एंटरप्रेन्योर’
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (X) वर (@shahfaesal) नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला जात आहे. ‘शेजारी देशातील एंटरप्रेन्योर’ असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. ओरिजनल व्हिडिओ पाकिस्तानातील एका यूट्यूबरने एक महिन्यापूर्वी आपल्या चॅनलवर शेअर केला होता. त्याने या महिलेचा इंटरव्यू घेतला होता.