मुंबई : सोशल मीडियावार एखादा ट्रोल होणारा व्हिडीओ पाकिस्तानचा असला, तर भारतीयांकडूनही त्याची चांगलीच खिल्ली उडवली जाते. पाकिस्तानची दनानीर मुबीर नावाच्या तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत ती आपल्या मैत्रीणींसोबत पार्टी करत होती. या व्हिडीओत ती ‘ये हमारी कार है, ये हम है, और ये हमारी पावरी हो रही है’, असं म्हणताना दिसत आहे. पार्टीचा उल्लेख पावरी असा केल्याने सोशल मीडियावर तिची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. भारतात ‘रसोडे मे कौन था’ असं रॅप साँग तयार करणारा म्युजिक कम्पोसर यशराज मुखाते याने तर मुलीच्या डॉयलॉगवर रॅप साँगच तयार केलं. तर ‘PIB फॅक्ट चेक’ने देखील या ट्रेंडचा फायदा घेऊन ट्विट केलं आहे (PIB factcheck memes on pawri viral video).
सोशल मीडियावर ज्या चुकीच्या बातम्या पसरतात त्याबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या PIB फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर हॅण्डलवरही ‘पावरी हो रही है’ या वाक्याचा वापर केला आहे. “तुमचं तशाप्रकारे पावरी होणार नाही. मात्र तुम्ही खोट्या बातम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आमच्यासोबत जुडू शकता”, असं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकचा हा अंदाज अनेकांना आवडला आहे (PIB factcheck memes on Pawari viral video).
You may not be able to ‘PAWRI’ like that, but you can join our party to bust fake news! #pawrihoraihai #PIBFactcheck pic.twitter.com/0pFB24WBet
— PIB Fact Check (@PIBFactCheck) February 13, 2021
यशरात मुखातेचा अनोखा व्हिडीओ
पाकिस्तानातून कोणताही फनी व्हिडीओ आला की भारतीय सोशल मीडिया क्रिएटर्स हात धुवून त्यांच्या मागे लागतात. यशराज मुखातेने तर पाकिस्तानी मुलीच्या व्हिडीओ म्युजिक आणि स्वत:चा आवाज टाकून भन्नाट व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ तुम्ही बघितला तर तुम्हालादेखील हसू आवरणार नाही.
दरम्यान, पावरीचा मुख्य व्हिडीओ दानानीर मुबीन हीने 6 फेब्रुवारी रोजी इन्साग्रामवर शेअर केला होता. तिने पार्टीचा शब्दोच्चार पावरी केल्याने तिला अनेकांनी ट्रोल केला. याशिवाय अनेकांना हा व्हिडीओ आवडला. त्यामुळे सोशल मीडियावर पावरीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.
हेही वाचा : राजधानी मुंबई आता भिकारीमुक्त होणार! मुंबई पोलिसांची मोहीम