Pandharpur Wari 2022: दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो. यावर्षी तब्बल 2 वर्षांनी पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) पार पडतीये. वारीत माऊलींची गर्दीच गर्दी पाहायला मिळतीये. यंदा 10 जुलैला पार पडणार्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 20 जूनला देहू मधून संत तुकाराम महाराजांची आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघाली. यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वारी करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. विठ्ठलाची (Vitthal) वारी हा फोटोग्राफर्ससाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. विठ्ठलाच्या भक्तीत रमलेला भक्त, पायी चालत जाणारे वारकरी, दमलेला थकलेला पण तरीही त्या माऊलीचा तो प्रसन्न चेहरा! यापेक्षा चांगला विषय फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी असूच शकत नाही. वारीच्या काळात अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. आपण जरी वारीत सहभागी नसलात तरी या पोस्ट्स बघून आपल्यालाही वारीत (Wari2022) सहभागी झाल्यासारखंच वाटेल…
– व्हिडीओग्राफर @haram_khor_ गणेश वानरे
– व्हिडीओग्राफर @haram_khor_ गणेश वानरे
– व्हिडीओग्राफर @haram_khor_ गणेश वानरे
– फोटोग्राफर @roshgulla रोशनी शाह
– फोटोग्राफर @kaam_dhanda रितीक सरवदे
(बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. हे फोटोज व्हिडिओज वेगवेगळ्या फोटोग्राफर्स काढलेले आहेत. आवडले तर त्यांना फॉलो करा.)