सगळ्यात मोठा Football Fan! फुटबॉल मॅच पाहता पाहता ऑपरेशन…

| Updated on: Dec 09, 2022 | 11:06 AM

रुग्णालयातील ऑपरेशनदरम्यान एक रुग्ण फिफा विश्वचषक पाहतोय.

सगळ्यात मोठा Football Fan! फुटबॉल मॅच पाहता पाहता ऑपरेशन...
watching football match during operation
Image Credit source: Social Media
Follow us on

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा सध्या जगभरात साजरी केली जात आहे. प्रत्येक फुटबॉल सामन्याची 90 मिनिटे कोणालाही चुकवायची नसतात. अनेक चाहते कतारला जाऊन स्टेडियममध्ये सामना पाहणं पसंत करत आहेत, तर टीव्हीलाही चिकटणारे अनेकजण आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. एका फुटबॉल चाहत्याच्या आत अशी क्रेझ दिसली, लोकांना याबद्दल जाणून आश्चर्य वाटलं. रुग्णालयातील ऑपरेशनदरम्यान एक रुग्ण फिफा विश्वचषक पाहतोय.

या धक्कादायक चित्राने भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांचेही लक्ष वेधून घेतले, आनंद महिंद्रांनी फिफा च्या ऑफिशिअल अकाऊंटला टॅग करून विचारले, हा माणूस ट्रॉफीसाठी पात्र आहे, नाही का?

आनंद महिंद्रा यांनी नोट्स फ्रॉम पोलंडच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “पोलंडमधील एका रुग्णाने स्पाइनल एनेस्थेशिया अंतर्गत ऑपरेशन करताना ऑपरेशन थिएटर मध्ये विश्वचषक पाहिला. उपचार घेत असलेल्या किल्सच्या हॉस्पिटलचे SP ZOZ MSWiA यांनी हा फोटो शेअर केला आहे.

ट्विटनुसार, पोलंडमधील किल्समध्ये रुग्णावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमधून ही घटना घडली आहे. 25 नोव्हेंबर रोजी या व्यक्तीची शरीराच्या खालच्या भागाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

या ऑपरेशन दरम्यान वेल्स आणि इराण यांच्यातील फुटबॉल सामना मी पाहू शकतो का, असे त्याने सर्जन्सना विचारले.

त्याची विनंती मान्य करण्यात आली आणि ऑपरेशन थिएटरमध्ये टेलिव्हिजन संच आणण्यात आला. त्याच्या पाठीच्या कण्याला भूल देण्यात आली. कंबरेच्या खाली शरीर सुन्न करण्यासाठी पाठीच्या कण्याला भूल देण्यात येते.

ऑपरेशन सुरु असताना या व्यक्तीने टीव्हीवर फुटबॉलची मॅच पाहिली. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय.