मुंबई: पुरुषाला मिशी असलीच पाहिजे, नाही का? मिशी असणं म्हणजे पुरुष मंडळींमध्ये अभिमान मानतात. मिशीबद्दल अनेक कथा बनवल्या गेल्या आहेत. आजही देशात अनेक ठिकाणी पुरुषाची मर्दानगी मिशी सोबतच जोडून पाहिली जाते. मिशांच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील पण आम्ही जी कथा सांगणार आहोत ती सर्व कथांपेक्षा खूप वेगळी आणि मनोरंजक आहे. आम्ही तुम्हाला जगातील सर्वात लांब मिशांशी संबंधित गोष्ट सांगणार आहोत.
पॉल स्लोसर यांच्या नावावर जगातील सर्वात लांब मिशांचा विक्रम आहे. त्याची लांब मिशी हीच त्याची ओळख आहे. पॉल स्लोसरवर ती म्हणही चांगलीच बसते. मिशी नसेल तर काहीच नाही. कारण त्याची मिशी 2 फूट 1 इंच (63.5 सेंमी) रुंद आहे.
पॉल स्लोसरच्या मिशांच्या पुढे जगातील सर्वात मोठी मिशीही अपयशी ठरलीये. त्याच्या लांब मिशांची कहाणी सर्वश्रुत आहे. आपल्या मिशीमुळे त्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आपले नाव नोंदवले आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो की कशामुळे स्लोसरला त्याच्या मिश्या जगातील सर्वात वेगळ्या मिश्या बनवण्याची प्रेरणा मिळाली.
याचे श्रेय स्लॉसरच्या पत्नीला जाते. एके दिवशी स्लॉसरच्या जेव्हा त्याच्या पत्नीला किस करायचे होते, तेव्हा तिने नकार दिला. पत्नीने सांगितले की, तिला स्लॉसरच्या कापलेल्या मिशीमुळे त्रास होतो. कारण स्लॉसरची कापलेली मिशी तिला काट्यासारखी टोचत होती आणि चुंबन घेताना ती टोचत होती. बायको किस करायला नकार देत असे. तेव्हापासून स्लॉसरने आपली मिशी कापणे बंद केले. तब्बल 30 वर्षे झाली तरी पॉल स्लॉसरने आपली मिशी कापली नाही. नंतर ही मिशी न कापल्यामुळे इतकी वाढत गेली की तिचा जागतिक विक्रमच झाला. आता त्याची मिशी 4 महिन्यांच्या बाळाएवढी लांब आहे.