‘पीछे देखो, पीछे तो देखो’ वाला गोंडस मुलगा आठवतो का? बघा इतका मोठा झालाय तो…

| Updated on: Apr 25, 2023 | 6:04 PM

या मुलाने आपल्या क्यूटनेसने सगळ्यांना वेड लावले. अहमद शाह यांच्या या व्हिडिओमुळे ते पाकिस्तानसह भारतातही खूप चर्चेत आले होते. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी तो शेअर केला आणि याचे मोठ्या प्रमाणात मिम्स बनवण्यात आले होते.

पीछे देखो, पीछे तो देखो वाला गोंडस मुलगा आठवतो का? बघा इतका मोठा झालाय तो...
peeche dekho kid
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील एक लहान मुलगा व्हायरल झाला होता जो पीछे देखो, पीछे तो देखो असं म्हणायचा. तुम्हाला आठवत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या मुलाचं नाव अहमद शाह आहे. या मुलाने आपल्या क्यूटनेसने सगळ्यांना वेड लावले. अहमद शाह यांच्या या व्हिडिओमुळे ते पाकिस्तानसह भारतातही खूप चर्चेत आले होते. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी तो शेअर केला आणि याचे मोठ्या प्रमाणात मिम्स बनवण्यात आले होते.

नुकतेच या मुलाचे आणखी अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये अहमद शाह आता खूप मोठा झाल्याचे दिसत आहे. मात्र त्याचा गोंडसपणा अजूनही कायम आहे. त्यांचे नवे फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ते सतत आपले फोटो शेअर करत असतात. आजही तो गोल चष्मा घालतो. त्याने चष्मा घातला असतानाच त्याचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता.

अहमद शाह सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतो. तो आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर करत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पाकिस्तानात सतत आपल्या चष्म्याने आणि त्याच्या रंगीबेरंगी कपड्यांमुळे लोकांना वेड लावत असतो. सध्या तो एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये धुमाकूळ घालत आहे.

त्याच्या एका काकाने त्याला काही विचारले तेव्हा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला होता, ‘पीछे तो देखो’ अहमद शाहचे गोंडस हावभाव आणि त्याचा चष्मा याने लोकांना अक्षरशः वेड लावले होते. भारतात विराट कोहलीसारखे अनेक सेलिब्रिटी त्याची नक्कल करताना दिसले आहेत. त्या व्हायरल व्हिडिओनंतरही तो अनेक व्हिडिओ बनवताना दिसला आहे आणि त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.