Marathi News Trending People are surprised after witnessing bizarre fish rainfall in Texas town and nearby places in Texas
Fish rain | इकडे मार्गशीर्ष संपला, तिकडे माशांचा पाऊस पडला? कसा? समजून घ्या!
नुकताच मार्गशीर्ष संपला आणि एकेठिकाणी चक्क माशांचा पाऊस पडलाय. मार्गशीर्ष आपल्याकडे महाराष्ट्रात जरी पाळला गेला असली, तर मार्गशीर्ष संपताच अमेरिकेत माशांचा पाऊस पडल्याची घटना समोर आली आहे.
1 / 5
मार्गशीर्ष म्हटला की अनेकदा आपल्याकडे या महिन्यात मांसाहार केला जात नाही. मार्गशीर्ष संपल्यानंतर मांसाहार केला जातो. नुकताच मार्गशीर्ष संपला आणि एकेठिकाणी चक्क माशांचा पाऊस पडलाय. मार्गशीर्ष आपल्याकडे महाराष्ट्रात जरी पाळला गेला असली, तर मार्गशीर्ष संपताच अमेरिकेत माशांचा पाऊस पडल्याची घटना समोर आली आहे. नेमकं असं कसं झालं? यावरुन चर्चांना उधाण आलंय. (Image Source - Twitter)
2 / 5
अमेरिकेत एक विचित्र गोष्ट घडली. चक्क माशांचा पाऊस पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलंय. अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये ठिकठिकाणी पाऊस पडावा, तसे हवेतून मासे जमिनीवर आदळलेत. काही ठिकाणी तर माशांचा खच रस्त्यावर पडल्याचं देखील पाहायला मिळालंय. या घटनेमुळे टेक्साससह जगभरातले लोक चकीत झाले आहेत. सुरुवातीला टेक्सासमध्ये जेव्हा पाऊस सुरु झालं, तेव्हा लोकांना वाटलं की गारा पडत आहेत. पण जेव्हा पाऊस थांबला तेव्हा लोकांनी जे पाहिलं, ते पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पाऊस किंवा गारा नसून, चक्क मासे हवेतून पडल्याचं समोर अनेकांनी पाहिलं. (Image Source - Twitter)
3 / 5
दरम्यान, अमेरिकेतलं स्थानिक वृत्तपत्र असलेल्या दी टेक्सारकाना गॅजेटनं काही लोकांच्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या आहेत. टेक्सासमध्ये टायर विकणाऱ्या एकानं सांगितलंय की त्यांनी स्वतः हवेतून माशांचा पाऊस पडताना पाहिला. वातावरण तेव्हा वादळासारखं झालं होतं. टायर विक्रेते असलेल्या या इसमानं आपल्या दुकानाबाहेरच 25-30 मासे पडल्याची माहिती दिली आहे. मश्चिमार्केटमध्ये गेल्यावर जसा वास येतो, तसाच वास संपूर्ण टेक्सास शहरात येत अससल्याचं टॉम यांनी म्हटलंय. काहींनी तर रस्त्यावर पडलेल्या या माशांवर हातही साफ करुन घेतल्याची सांगितलं जातंय. (Image Source - Twitter)
4 / 5
हवेतून पडलेल्या या माशांचं डोकं कापलं गेलेलं असल्याचंही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. उंचावरुन पडल्यामुळे असं झालं असावं, असाही संशय व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, क्रॉन्क्रिटच्या रस्त्यावर पडल्यानंतर काही काळचं मासे आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करु शकले. त्यानंतर तडफडून त्यांनी जीव सोडला, असंही काहींनी म्हटलंय. टेक्सारकानाच्या समरहिन रोडवर तीन ठिकाणी अशाप्रकारे माशांचा पाऊस पडलाय. तर अनरकन्यास राज्याच्या सीमेवरही माशांचा रेकॉर्डब्रेक पाऊस झालाय. सुरुवातीला काहींना हा प्रकार म्हणजे अजबच गोष्ट वाटली होती. पण तसं नसून ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. (Image Source - Twitter)
5 / 5
अमेरिकेत टॉर्नेडो, म्हणजेच वावटळ सारखे प्रकार सर्सार पाहिले जातात. अशाच प्रकारे जर समुद्रातून जर टॉर्नेडो जमिनीच्या दिशेने जेव्हा येतो, तेव्हा तो आपल्यासोबत माशांसोबत दगड, कीडे, छोटी मोठी जनावरं असं सगळं टॉर्नेडो आपल्या कवेत घेतं आणि त्याला जमिनीवर आणून आदळतं. यालाच वॉटरस्पाऊट असंही म्हणतात. यात अनेकदा मासे फसतात आणि जेव्हा टॉर्नेडो जमिनीवर आदळतो, तेव्हा आपल्यासोबत तो माशांनाही जमिनीवर आपटतो. याला काही जण माशांचा पाऊस म्हणतात, कारण त्यांना यामागची नेमकी नैसर्गिक प्रक्रिया काय आहे, हे माहीत नसतं. काही जाणकरांच्या मते ही एक अत्यंत दुर्मिळ अशी प्रक्रिया असून क्वचितच असं घडल्याच्या नोंदी आढळल्या आहेत. टेक्सासमध्ये घडलेली घटनाही अशीच दुर्मिळ, पण कायमस्वरुपी लक्षात राहण्यासारखी आहे. (Image Source - Twitter)