VIDEO : गाणं गाताना मुलींविषयी अश्लील टिप्पणी, लोक भडकले, अर्ध मुंडन करुन गावात धींड, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Mar 11, 2021 | 3:20 PM

गाणं गाताना मुलींविषयी अश्लील टिप्पणी करणं एका गायकाला चांगलंच महागात पडलंय (People badly treated singer who sung vulgar songs in Bhojpuri video goes).viral

VIDEO : गाणं गाताना मुलींविषयी अश्लील टिप्पणी, लोक भडकले, अर्ध मुंडन करुन गावात धींड, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

पाटणा : गाणं गाताना मुलींविषयी अश्लील टिप्पणी करणं एका गायकाला चांगलंच महागात पडलंय. लोकांनी या गायकाला अशी शिक्षा दिलीय की ती शिक्षा तो आयुष्यभर विसरु शकणार नाही. याशिवाय मुलींबाबत अश्लील शब्दप्रयोग करणाऱ्या विकृतांना अशीच शिक्षा द्यावी, अशी भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण नेमकं काय, याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत (People badly treated singer who sung vulgar songs in Bhojpuri video goes viral).

नेमकं प्रकरण काय?

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील ही घटना आहे. मधेपुरातील एका स्थानिक गायकाने एक गाणं तयार केलं होतं. या गायकाचं नाव पिंटू दीवाना असं आहे. पिंटूने भोजपुरी भाषेतील गाणं शूट केलं होतं. मात्र, या गाण्यात अश्लीलता होती. याशिवाय त्याने मुलींविषयी अश्लील शब्दांचा प्रयोग केला होता. त्याचं हे गाणं एका कार्यक्रमात लागलं. हे गाणं ऐकल्यानंतर लोक प्रचंड भडकले. त्यानंतर लोकांनी थेट पिंटूचा घरचा रस्ता धरला.

गायक पिंटूची गावात धींड

संतप्त नागरीक पिंटूच्या घरी गेले. त्याला तिथून उचलून देवीदास टोला येथे आणलं गेलं. तिथे पिंटूच्या डोक्यावरील केस कापण्यात आले. त्याचे अर्ध मुंडन केलं गेलं. त्यानंतर थेट पिंटूची गावात धींड काढण्यात आली. देवीदास टोला ते नरकटिया टोला अशी त्याची धींड निघाली (People badly treated singer who sung vulgar songs in Bhojpuri video goes viral).

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

यावेळी लोकांनी गायकाची प्रचंड मजा घेतली. अनेकांनी मोबाईलवर व्हिडीओ शूट केले. काही लोकांनी आपापल्या मित्रांना व्हिडीओ कॉल करुन पिंटूची अवस्था दाखवली. तर काही लोकांनी थेट फेसबुक लाईव्ह देखील केल्याची माहिती समोर आलीय. हेही असे की थोडकं, काही लोकांनी त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे पिंटूची प्रचंड नाचक्की झाली.

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अनेक जण यावर प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक या घटनेवर नाराजी व्यक्त करत आहेत. तर काही गायकाला योग्य शिक्षा मिळाल्याचं म्हणत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा.

व्हिडीओ बघा : 

हेही वाचा : सिनीअर PI डावलून API कडे CIU चं प्रमुखपदं कसं? सचिन वाझेंसाठी नियम पायदळी तुडवल्याचा आरोप