केरळमध्ये एका अंत्यसंस्काराच्या वेळी काढलेला एक फोटो (Funeral Of Kerala Family Goes Viral)सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photo On Social Media) होत आहे, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य हसत पोज देताना दिसत आहेत. आता सोशल मीडियात या फोटोबद्दल चर्चा सुरू झाली आहे की, हे कसलं कुटुंब आहे, जे कुणाच्या मृत्यूवर इतका आनंद साजरा करत आहे. केरळचे मंत्री व्ही. सिनवानकुट्टी देखील यात सामील झाले तेव्हा या चित्राने सोशल मीडियावर चर्चा सुरू केली. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पठाणथिट्टा जिल्ह्यातील मलापल्ली गावात ही घटना घडली असून, गेल्या आठवड्यात 95 वर्षीय मरियमा यांच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले होते. 17 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये कुटुंबातील किमान 40 जण हसत-हसत दिसत आहेत. गेल्या एक वर्षापासून मरियमा अंथरुणाला खिळून होत्या, गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांची प्रकृती लक्षणीयरीत्या खालावली होती. त्यांना नऊ मुले आणि 19 नातवंडे जगभर पसरली आहेत. अंत्यविधीच्या वेळी बहुतांश सदस्य घरीच होते.
केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनीही या कुटुंबाला पाठिंबा दर्शविला आहे. त्याने फेसबुकवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, ‘मृत्यू वेदनादायी आहे. पण तोही एक निरोपच असतो. जे नेहमी आनंदी असतात त्यांना स्मितहास्याने निरोप देण्यापेक्षा अधिक आनंदी काय असू शकते?” असे म्हटले आहे, “या फोटोला नकारात्मक टिप्पण्यांची आवश्यकता नाही.” असंही केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी म्हटलंय. काही लोकांनी हसतमुखाने पोझ दिल्याबद्दल या कुटुंबावर टीका केली आहे, तर अनेकांनी यात काहीही गैर नसल्याचं समर्थनात लिहिलं आहे.
या टीकेवर चर्च चे धर्मगुरू आणि मृत व्यक्तीचा मुलगा डॉ. जॉर्ज ओमेन म्हणतात की, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अशा नकारात्मक गोष्टींची पर्वा नाही. “मरियमा शेवटच्या श्वासापर्यंत आनंदाने जगल्या. तिचे आपल्या सर्व मुलांवर आणि नातवंडांवर प्रेम होते. डॉ. जॉर्ज ओमन यांनी असेही म्हटले आहे की, “ज्यांना हा फोटो आवडला नाही, त्यांनी मृत्यूनंतर फक्त अश्रू आणि कण्हणे पाहिले असतील. दु:ख व्यक्त करण्याऐवजी आम्ही आनंदाने मरियमाला निरोप द्यायचा निर्णय घेतला.”