ईईई…Delhi Metro मध्ये कपलचं इतक किळसवाण कृत्य, पाहताच लोकांना उल्टी! Video

| Updated on: Jan 03, 2024 | 9:06 AM

Delhi Metro News | दिल्ली मेट्रोमधील आणखी एका व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांच डोक खराब झालं आहे. हा व्हिडिओच इतका किळसवाणा आहे की, व्हिडिओ पाहिल्यानंतर उल्टीची फिलिंग येते.

ईईई...Delhi Metro मध्ये कपलचं इतक किळसवाण कृत्य, पाहताच लोकांना उल्टी! Video
Couple Delhi Metro Video
Follow us on

Delhi Metro News | सध्या मेट्रो आणि ट्रेन्समध्ये व्हिडिओ आणि रील्स बनवण्याचा ट्रेंड आहे. अनेकजण रील्स बनवून सोशल मीडियावर हिट होण्याचा प्रयत्न करत असतात. कोणी डान्स करतं, तर कोणी गाण म्हणतं. त्यात काही असे लोक सुद्ध असतात, जे विचित्र हरकती करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रयत्नात काही जण खूप वाईट पद्धतीने ट्रोल होतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कपलच्या व्हिडिओची चर्चा आहे. जोडप्याचा हा व्हिडिओ पाहून लोकांचा संताप अनावर होतोय. कारण दिल्ली मेट्रोमध्ये त्यांनी कृतीच तशी केली. फक्त लोकांना रागच आला नाही, तर उल्टी सारखी फिलिंग आली.

हे जोडपं बुटांमधून कोल्ड ड्रिंक पीत होतं. व्हिडिओमध्ये दिसतय मुलगा-मुलगी मेट्रोमध्ये बसलेत. या दरम्यान मुलगा आपला बूट काढून हातामध्ये घेतो. शेजारी बसलेल्या मुलीच्या हातात कोल्ड ड्रिंकची बॉटल आहे. मुलगी थोड कोल्ड ड्रिंक त्या बुटामध्ये ओतते. त्यानंतर मुलगा बुटामध्ये पाईप टाकून ते कोल्ड ड्रिंक पितो. त्यानंतर मुलगी सुद्धा अशीच काहीतरी हरकत करताना दिसते. कोल्ड ड्रिंक पिण्याच्या तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हा पाहिल्या असतील. पण कोणी बुटातून कोल्ड ड्रिंक पितोय हे तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहिलं असेल. हा व्हिडिओ पाहतान खूप किळसवाणेपणाची फिलिंग येते.

किती हजार लोकांनी व्हिडिओ लाईक केलाय?

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर rkramaad_009 आयडीवरुन शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत 1.6 मिलियन म्हणजे 16 लाख वेळा पाहण्यात आलाय. 17 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केलाय. व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या कमेंटस करत आहेत.


‘चूक तुझी नाही भावा माझी आहे’

“चूक तुझी नाही भावा माझी आहे, मी इन्स्टाग्राम ऑन केलं” अशी एका युजरने कमेंट केलीय. ‘कोल्ड ड्रिंक पिण्याची पद्धत थोडी कॅज्युल आहे’ मस्करीमध्ये दुसऱ्या युजरने अशी कमेंट केलीय.