शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्सचं जग म्हणजे एक विहीर, ज्यात शिरल्यावर त्या व्यक्तीला बाकी काहीच दिसत नाही, काहीच ऐकू येत नाही. होय, लोक इन्स्टाग्राम रील्सवरून ते फेसबुक आणि स्नॅपचॅटच्या रील वर्ल्डमध्ये कधी पोहोचतात हे ही त्यांना कळत नाही! सगळीकडे स्क्रोल करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. मग एका झटक्यात त्या माणसाच्या लक्षात येतं की दोन तास उलटून गेले. जर तुम्हाला रील्स पाहण्याची सवय असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हायरल रीलमध्ये तुम्हाला एक लहान मुलगी दिसेल. ही मुलगी अभ्यास करायचा अतोनात प्रयत्न करतेय. पण ती एक ओळ वाचते न वाचते तेच हातात फोन घेते, रिल्स बघू लागते. तिला मध्येच रिल्स बघायचं वेड लागतं आणि मग ती बराच वेळ रिल्स बघत बसते. हे करत असताना ती विसरून जाते की ती अभ्यास करत होती. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही स्वतःला त्या जागी ठेवून बघाल. आपल्यालाही रिल्सचं असं वेड असेल तर आपणही हसून वेडे व्हाल. काही युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये असंही लिहिलं आहे की, त्यांच्यासोबतही असं घडतं.
‘दिशू यादव’ (@Dishu यादव) यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून 21 डिसेंबर रोजी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला बातमी लिहिल्यापर्यंत 56 लाख 45 हजारांहून अधिक लाइक्स आणि 11.5 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच हजारो युजर्सनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेक युझर्सनी सांगितले की, त्यांच्यासोबतही असे घडते, तर काहींनी ही परीक्षेत नापास होण्याची भीती असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे एका व्यक्तीने लिहिलं- रील्सची सवय कधी निघून जाईल माहित नाही.