माणसाचं वय वाढलं, माणूस म्हातारा झाला की त्याला गरज असते नातेवाईकांची. एकटेपणा माणसाला खूप खातो असं म्हटलं जातं. उतारवयात मुलं जवळ असली की आधार वाटतो. पण खरं तर माणूस या वयात हट्टी पण तितकाच असतो. आता बघा ना एका गावात एक वयस्कर माणूस एकटाच राहत होता. त्याच्या जवळ त्याच्या देखभालीसाठी कुणीच नव्हतं. गावकऱ्यांनी त्याला खूप समजावलं की त्याने नातेवाईक, मुलाच्या जवळ जाऊन राहावं पण हट्टी माणूस काय ऐकेना. मग गावकऱ्यांनी शेवटी या वयस्कर माणसाचं घर उचललं आणि ते घर ओढत ओढत नेलं. मुलगा जिथे रहात होता तिथे नेऊन हे घर ठेवलं. आता तुम्ही म्हणाल घर कसं ओढलं बुआ?
‘गुड न्यूज मुव्हमेंट’ नावाच्या अकाऊंटसह हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. या अकाउंटवरून अनेकदा पॉझिटिव्ह व्हिडिओ शेअर केले जातात.
नुकतंच झोपडीसारखं घर उचलून ते दुसऱ्या ठिकाणी हलवतानाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. या व्हिडीओ मध्ये दिसतंय की काही लोक 7 फूट उंचीचं घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खांद्यावर ओढून नेतायत.
मिळालेल्या माहितीनुसार, या घरात एक वृद्ध व्यक्ती एकटीच राहत होती. त्याची काळजी घेणारे कोणीही नव्हते. वृद्ध व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. बाकीचे कुटुंब काही अंतरावर दुसऱ्या घरात राहत होते. त्यांची मुले आणि नातवंडेही इतरत्र राहत असत.
वयस्कर माणसाच्या कुटुंबीयांनी अनेकदा त्यांना त्यांच्याजवळ शिफ्ट व्हायला सांगितलं, पण तिथे रिकामं घर नव्हतं. अशा परिस्थितीत स्थानिक लोकांनी या वृद्ध व्यक्तीचे घर उचलून नेले. हे अशक्य काम सुमारे 2 डझन लोकांनी मिळून शक्य करून दाखवले.