‘घे खा, किती खाणार…’, भ्रष्ट अधिकाऱ्यावर लोकांनी पाडला नोटांचा पाऊस, धक्कादायक व्हिडिओ

| Updated on: Jan 13, 2025 | 5:43 PM

Viral Video News: व्हिडिओमध्ये लोक अधिकाऱ्यास सांगत आहे की, आमच्या सोसायटीत घाण पाणी येत आहे. त्याचवेळी आणखी एक व्यक्ती बिस्समिल्ला सोसायटीत घाण पाणी येत असल्याचे सांगत आहे. काही लोक म्हणतात, किती पैसे खाणार. घे खा...असे म्हणत नोटांचा वर्षाव करत आहे.

घे खा, किती खाणार..., भ्रष्ट अधिकाऱ्यावर लोकांनी पाडला नोटांचा पाऊस, धक्कादायक व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ
Follow us on

Viral Video: गुजरातमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमधून भ्रष्ट अधिकाऱ्यांना जनतेने शिकवलेला धडा दिसत आहे. संपप्त झालेले लोक गुजराती भाषेत अधिकाऱ्याला बोलत आहे. त्याच्यावर नोटांचा वर्षाव करत आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ या व्हि़डिओची पुस्टी करत नाही.

गुजरातमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून काही लोक सरकारी कार्यालयात संतप्त झालेले दिसत आहे. अधिकारी कुर्सीवर बसलेला दिसत आहे. लोक गुजराती भाषेत त्याच्यावर आरोप करत आहेत. तसेच त्याच्यावर नोटांचा वर्षाव करत आहे. लोकांचा संताप या व्हिडिओमधून दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

कोणी केला व्हिडिओ शेअर?

कलम की चोट नावाच्या यूजरने त्याच्या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यात म्हटले आहे की, घे खा ! कितीन हरामची कमाई खाणार, जनतेने दिले त्याच भाषेत उत्तर. आता अधिकारी काय करणार. त्याने नोकरी मिळवण्यासाठी लाच दिली असणार. आता हे पैसे तो आपले आका (उच्च अधिकाऱ्यांना) देत असणार.

नागरिकांची मागणी काय?

व्हिडिओमध्ये लोक अधिकाऱ्यास सांगत आहे की, आमच्या सोसायटीत घाण पाणी येत आहे. त्याचवेळी आणखी एक व्यक्ती बिस्समिल्ला सोसायटीत घाण पाणी येत असल्याचे सांगत आहे. काही लोक म्हणतात, किती पैसे खाणार. घे खा…असे म्हणत नोटांचा वर्षाव करत आहे. त्याचवेळी काही लोक या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करत आहे. अधिकारी हात जोडून बसला आहे. गुजरातमधील हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? त्याची काहीच माहिती नाही.

व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला. अनेक जण कमेंट व्यक्त करत संताप व्यक्त करताना दिसत आहे. लाचखोर कर्मचाऱ्यांना असेच उघडे केले पाहिजे, असे एक नेटकरी म्हणताना दिसत आहे. चांगला पगार असतानाही ही लोक लाच घेतल्याशिवाय काम करत नाही, असे आणखी एक युजरने कमेंटमध्ये म्हटले आहे.