मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. ऑनलाइन कोडे! होय लहानपणी आपण ही कोडी तोंडी सोडवायचो आता ही कोडी ऑनलाइन आली आहेत. या कोड्यांना ऑप्टिकल भ्रम असेही म्हणतात. एखादा किचकट फोटो या प्रकारामध्ये दाखवला जातो आणि प्रश्न विचारला जातो. कधी यात आधी काय दिसतंय? वेगळा शब्द, अक्षर, अंक शोधून दाखवा? किती प्राणी आहेत? असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. शास्त्रज्ञ आणि काही अभ्यासकांच्या मते ऑप्टिकल भ्रमामुळे तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्त्व कळून येतं. तुम्ही कसे आहात हे कळतं. बरेचदा ऑप्टिकल इल्युजन प्रवेश परीक्षा किंवा अजून कुठल्याही महत्त्वाच्या परीक्षांमध्ये सुद्धा वापरले जातात. या किचकट प्रश्नाचं उत्तर शोधायचं असल्यास आपल्याला डोकं शांत ठेवावं लागतं.
आता हे चित्र बघा. या चित्रात तुम्हाला सर्वात आधी काय दिसतंय हा प्रश्न विचारण्यात आलाय. यात तुम्हाला आधी काय दिसतंय यावर तुमचं व्यक्तिमत्त्व ठरतं. प्रत्येकाचे स्वभाव, बोलणं, वागणं वेगवेगळं असतं. चित्रात आधी काय दिसतंय हे व्यक्तीच्या वेगळं असण्यावर अवलंबून असतं. या चित्रात बघा. या चित्रात बाळ, झाड, एक जोडपं दिसतंय. यात तुम्हाला आधी काय दिसतंय ते सांगायचं आहे. जे आधी दिसेल त्यावर तुमचं व्यक्तिमत्त्व!
या चित्रात आधी तुम्हाला बाळ दिसलं असेल तर तुम्हाला तुमची पर्सनल स्पेस आणि एकांत प्रचंड आवडतो. तुम्ही फिरायला जाण्यापेक्षा घरात एकटं राहणं पसंत करता तुम्ही एकटे राहून स्वतःला रिचार्ज करता यात तुम्हाला वाईट वाटण्यासारखं काही नाही. जर तुम्हाला आधी जोडपं दिसलं असेल तर तुम्हाला लोकांसोबत चांगले संबंध ठेवायला आवडतात. जरी तुम्हाला पार्टी, गेट टू गेदर आवडत असतील तरीसुद्धा तुम्ही कमी मित्र मैत्रिणी ठेवता. काही लोकांसोबतच तुम्ही चांगले संबंध जोपासता. जर तुम्ही झाड आधी पाहिलं असेल तर तुमच्यात खूप एनर्जी आहे. तुम्ही खूप उत्साही आणि साहसी आहात. तुम्ही खूप हजरजबाबी आहात.