पेरूची राजधानी लिमामध्ये शुक्रवारी विमानतळावरील धावपट्टीवर LATAM एअरलाइन्सचे विमान अग्निशमन दलाच्या ट्रकवर आदळले. या भीषण अपघातात विमानातील क्रू मेंबर्ससह सर्व 120 प्रवासी जखमी न होता बचावले. मात्र, या अपघातात धावपट्टीवर उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांचे प्राण गेले.
अपघातानंतर काही वेळातच एका जोडप्याला विमानातून बाहेर काढण्यात यश आलं, तेही जखमी झाले नाहीत. सेल्फीमध्ये पत्नीसोबत दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव एनरिक व्हर्सी-रोस्पीग्लिओसी असून तो या अपघात झालेल्या विमानातून बचावलाय.
फोटोमध्ये तो हसताना दिसतोय त्याच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर आग विझवणारे रसायन दिसत आहे, यावरून कळून येतं की, अपघातात तो जखमी न होता बचावला आहे.
त्यांच्या मागे एक LATAM विमान आहे जे अर्धवट जळालेले आहे आणि ते जमिनीवर उजव्या पंखावर टेकलेले दिसू शकते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘जेव्हा आयुष्य तुम्हाला आणखी एक संधी देते’.
Cuando la vida te da una segunda oportunidad #latam pic.twitter.com/Vd98Zu98Uo
— Enrique Varsi-Rospigliosi (@enriquevarsi) November 18, 2022
A320 सिस्टिम्स नावाच्या फेसबुक पेजनेही हा फोटो शेअर केला आहे. ‘सेल्फी ऑफ द इयर, थँक गॉड इट्स फाईन’ असं कॅप्शन दिलं होतं. तर काही लोक या जोडप्यावर टीका करत आहेत.
एका यूजरने लिहिले- किती विचित्र आहे की, या दुर्घटनेतून वाचल्यानंतर लोक सेल्फी काढत आहेत. मीही तसंच करेन.