गुलाबी रंगाचा दुर्मिळ हिरा! लिलावात या हिऱ्यानं सगळे विक्रम मोडीत काढले

| Updated on: Oct 15, 2022 | 5:18 PM

हिऱ्याचा लिलाव झाला तेव्हा त्याची किंमत पाहून सर्वजण चकित झाले होते. कारण या हिऱ्याने लिलावाचे सर्व विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला.

गुलाबी रंगाचा दुर्मिळ हिरा! लिलावात या हिऱ्यानं सगळे विक्रम मोडीत काढले
Rare pink diamond
Image Credit source: Social Media
Follow us on

अनेक वेळा हिऱ्यांची किंमत किंवा हिऱ्यांचा लिलाव लोकांना आश्चर्यचकित करतो. पण कल्पना करा की जर एखादा दुर्मिळ गुलाबी रंगाचा हिरा असेल तर? असंच एक प्रकरण समोर आलंय. हिऱ्याचा लिलाव झाला तेव्हा त्याची किंमत पाहून सर्वजण चकित झाले होते. कारण या हिऱ्याने लिलावाचे सर्व विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला.

रंगीबेरंगी हिऱ्यांपैकी दुर्मिळ आणि सर्वात मौल्यवान हिऱ्यांचा असा हा इव्हेंट हाँगकाँगमधला आहे.
एपीच्या अहवालानुसार, हा गुलाबी हिरा रंगीत हिऱ्यांपैकी सर्वात दुर्मिळ आणि मौल्यवान आहे.

भारतीय चलनात त्याचे मूल्य अंदाजे ४१३ कोटी रुपये आहे. हाँगकाँगच्या सूथबेने या हिऱ्याचा लिलाव केला होता. लिलावात विकल्या गेलेल्या या हिऱ्याने सर्व विक्रम मोडीत काढत लिलावात सर्वाधिक किंमत प्रति कॅरेट असा विश्वविक्रम केला.

विल्यमसन पिंक स्टार या ११.१५ कॅरेटच्या या स्टारने प्रति कॅरेट ५.२ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली, जी २०१५ मध्ये लिलावात काढण्यात आलेल्या निळ्या हिऱ्याची किंमत ४० लाख डॉलर प्रति कॅरेट होती. ही त्यावेळेची विक्रमी किंमत होती. या गुलाबी हिऱ्याची किंमत तुलनेत जास्त आहे.

खरेदीदार अमेरिकेत खासगी संग्राहक आहे. खरं तर, विल्यमसन पिंक स्टारचे नाव दोन दिग्गज गुलाबी हिऱ्यांपासून आले आहे.

यापैकी पहिला २३.६० कॅरेटचा विलियम्सन हिरा आहे, जो १९४७ मध्ये दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना लग्नाची भेट म्हणून मिळाला होता.

दुसरा ५९.६० कॅरेटचा गुलाबी स्टार हिरा आहे जो २०१७ मध्ये लिलावात विक्रमी ७.१२ दशलक्ष डॉलर्सला विकला गेला होता.