मुंबई: पिझ्झाचं नाव काढलं तरी आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या पिझ्झा पार्टीचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावरचा (Internations Space Station) आहे. या स्पेस स्टेशनवरील पिझ्झा पार्टी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. (Pizza Party at International space Station)
अंतराळात प्राणवायू आणि गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे अनेक गोष्टींवर मर्यादा येतात. त्यामुळे पृथ्वीवर अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी अंतराळात करायच्या म्हटलं की ते एक मोठे आव्हान असते. मात्र, कधीकधी याच मर्यादा किती मजेशीर ठरू शकतात, याचा प्रत्यय हा व्हीडिओ पाहिल्यावर येईल. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरील फ्लोटिंग पिझ्झा नाईट हा व्हीडिओ पाहून अनेकजण अचंबित झाले आहेत. अंतराळवीर थॉमस पेस्केट यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत अंतराळवीर पिझ्झा पार्टी करत आहेत. अंतराळवीरांनी पिझ्झा तयार करण्यापासून ते पिझ्झा खाण्यापर्यंतचा प्रवास व्हीडिओत पाहायला मिळतो. मात्र, याठिकाणी शून्य गुरुत्वाकर्षण असल्याने या अंतराळवीरांचा पिझ्झा हवेत तरंगताना दिसत आहे. अंतराळवीर हवेत तरंगणाऱ्या पिझ्झा खाताना दिसत आहेत. हे एकूणच दृश्य मजेशीर आहे.
अंतराळवीरांची ही फ्लोटिंग पिझ्झा पार्टी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या व्हीडिओला आतापर्यंत बरेच व्ह्युज आणि लाईक्स मिळाले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हीडिओ आतापर्यंत 5.8 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. Northrop Grumman कडून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर रसद पोहोचवण्यासाठी Cygnus Resupply Spacecraft हे यान सोडण्यात आले होते. यामध्ये पिझ्झाच्या साहित्याचा समावेश होता. त्यामुळेच अंतराळवीर ही पिझ्झा पार्टी करू शकले.
संबंधित बातम्या:
Video | बर्थडे सेलिब्रेशनसाठी तरुणी रुसली, समजूत काढताना बॉयफ्रेंडने हात टेकले, व्हिडीओ पाहाच !
(Pizza Party at International space Station video goes Viral on Social Media)