मुंबई: पोलीस चोराला पकडतात असं दृश्य तुम्ही कधी डोळ्यांनी पाहिलंय का? आजवर तुम्ही हे दृश्य अनेक चित्रपटांमध्ये नक्कीच पाहिलं असेल. ही दृश्य पाहताना सुद्धा अंगावर काटा येतो कारण या दृश्यावेळी खूप गंभीर म्युझिक लावलं जातं. एकदम तणावपूर्वक वातावरण निर्माण केलं जातं. साहजिकच आहे चित्रपटांमध्ये जसं दृश्य असेल त्यानुसार वातावरण निर्मिती केली जाते. चित्रपटांमुळे आपल्याला सुद्धा अनेक प्रकारचे दृश्य पाहायला मिळतात. पण तुम्ही कधी सिरीयस दृश्य आणि रोमँटिक वातावरण असा विरोधाभास पाहिलाय का? कधी पोलीस चोराला पकडत असताना ते एकदम रोमँटिक पद्धतीने चोराला पकडतायत असं पाहिलंय का? तुम्हालाही प्रश्न पडला असेल, हे शक्य आहे का? हा व्हिडीओ बघा…
हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. पोलीस एका चोराला पकडायला जातात, अरेस्ट करायला जातात. इतकंच आहे या व्हिडिओमध्ये. मग खास काय आहे? या व्हिडीओ मध्ये तुम्ही बघाल तर पोलीस एकदम रोमँटिक पद्धतीने या चोराला पकडत आहेत. जेव्हा ते चोराला अरेस्ट करायला जातात तेव्हा तो चोर निवांत झोपलेला असतो. पोलीस तिथे जाऊन त्याला खूप प्रेमानं उठवतात. अगदी गोंजारायचं बाकी असतं असं म्हणायला हरकत नाही.
Romantic arrest pic.twitter.com/jBJ87U6nCx
— Insane Reality Leaks (@InsaneRealitys) September 4, 2023
झोपलेल्या चोराला ते प्रेमानं उठवतात, प्रेमाने आमच्या सोबत चल असं म्हणतात. अगदी त्याच्या गालाला वगैरे हात लावून त्याची बॅग उचलतात त्याचा हात प्रेमानं फोल्ड करतात आणि त्याला अरेस्ट करतात. इतकी रोमँटिक अरेस्ट तुम्ही कधीच पाहिली नसेल. हा व्हिडीओ पन्नास लाख लोकांनी पाहिलेला आहे. व्हिडीओ बघूनच तुम्हाला कळेल की व्हिडीओ इतका व्हायरल का झालाय. यापेक्षा जास्त रोमँटिक व्हिडीओ तुम्ही आजतागायत पाहिला नसेल याची खात्री आहे.