मुंबई : अनेकदा सर्वसामान्य लोक संकटात असताना पोलीस (Police) देवासारखे धावून येतात. नुकतंच राजस्थानमध्ये (Rajsthan) एक घटना घडली. यात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. राजस्थानमधील करौली (Karauli) भागात दोन दिवसांपुर्वी झालेल्या हिंसाचारात देवदूत बनून पोलिस अधिकाऱ्याने एका लहान मुलाचा जीव वाचवलाय. एकीकडे आगीचा भडका होत होता, अश्यात या आगीतून हा पोलीस लहान मुलाला आपल्या छातीशी कवटाळून त्याचा जीव वाचण्यासाठी प्रयत्न करत होता. नेत्रेश शर्मा (Netresh Sharma) असं या पोलीस कॉन्स्टेबलचं (Police Constable) नाव आहे. सोशल मीडियावर (Social Media Trending) शर्मा यांच्या कृतीचं तोंड भरून कौतुक होत आहे. एवढंच नव्हे तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajsthan CM Ashok Gehlot) यांनीही शर्मा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांच्या कामाचं कौतुक केलं. शिवाय त्यांना बढतीही दिली.
गुढीपाडव्याच्या दिवशी राजस्थानमधील करौलीमध्ये हिंसाचार उसळला. ठिकठिकाणी आगीच्या घटना घडल्या. या आगीत अनेक घरं आणि दुकानं, वाहनं जाळली गेली. या घटनेवेळी कॉन्स्टेबल नेत्रेश शर्मा तिथे होते त्यांनी आगीशी दोन हात करून एका कुटुंबातील लहान मुलाचा जीव वाचवला. त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. त्यांच्या या कृती सर्वत्र कौतुक होतंय.
कॉन्स्टेबल नेत्रश शर्मा यांच्या कामाचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीनी शर्मा यांना फोन करून कौतुक केलं. “आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तुमच्या कृतीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे”, असं गहलोत म्हणालेत. शिवाय शर्मा यांना बढती देऊन कॉन्स्टेबलरून हेड कॉन्स्टेबल पद दिलं.
ट्विटरवर शर्मा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेकांनी त्यांचं कौतुक करत त्यांच्या कार्याला सलाम ठोकलाय. अंधाराततील प्रकाश आहात. कठीण काळातील खरे मदत करणारे आहात, असं म्हणत त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातंय. तर दुसऱ्याने मै खाकी हू म्हटलंय. हा सिनेमा नाही तर वास्तव आहे. तुमच्या कार्याला कडक सॅल्यूट असं आणखी एक नेटकरी म्हणाला आहे. तर काहींनी हा फोटो शेअर करत माणुसकी जिवंत असल्याचं म्हटलंय.
“तम में प्रकाश हूँ,
कठिन वक़्त की आस हूँ।”
So proud of constable Netresh Sharma of Rajasthan Police for saving a precious life. This picture is in deed worth a thousand words.. pic.twitter.com/U2DMRE3EpR— Sukirti Madhav Mishra (@SukirtiMadhav) April 4, 2022
मैं ख़ाकी हूँ. ??? pic.twitter.com/xkbMJeCpbs
— Awanish Sharan (@AwanishSharan) April 4, 2022
यह कोई फिल्म नहीं हकीकत है।
करौली में अपना कर्तव्य निभाते हुए 4 लोगों की जान बचाने वाले कांस्टेबल श्री नेत्रेश शर्मा हैं
अपनी जान की परवाह ना कर कर्तव्य निभाने वाले श्री नेत्रेश का कार्य प्रशंसनीय है।
ट्विटर पर ट्विट ट्वीट खेलने वाले upsc के प्रॉडक्ट अपने जवान से सीख सकते है। pic.twitter.com/zBOiHXH9X5
— Pawan (@SonOfMagadh) April 4, 2022
संबंधित बातम्या