मुंबई : सोशल मीडियावर दररोज काहीतरी व्हायरल ( Viral Video ) होत असतं. ज्याला पाहून आपण कधी पोट धरुन हसतो तर कधी आपल्या डोळ्यात पाणी देखील येतं. काही व्हिडिओ तर मनाला इतके भिडतात की, आपण वेगळ्याच विश्वात जातो. असे अनेक व्हिडिओ आहेत जे आपले हृदय पिळवटून टाकतात. असाच एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही भावूक व्हाल. व्हिडिओ पाहून यूजरर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘हा जगातील सर्वोत्तम उत्सव आहे. अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
धाकट्या भावाचा वाढदिवस
हा व्हायरल झालेला व्हिडिओ दोन भावांचा आहे. ज्यामध्ये मोठा भाऊ लहान भावाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज आला असेल की ते खूप गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्याकडे साधा केक घेण्यासाठी देखील पैसे नाहीत. पण मोठ्या भावाने धाकट्या भावाचा वाढदिवस साजरा करण्याचा इतका छान मार्ग शोधला की, कोणालाही भरुन येईल. भाकरीवर भाजी किंवा चटणीसारखे काहीतरी ठेवले आहे. त्यावर त्याने दोन मेणबत्त्या पेटवल्या आहेत. मोठा भाऊही लहान भावासाठी वाढदिवसाचे गाणे गातो आहे.
एव्हरीथिंग अबाउट नेपाळ नावाच्या पेजने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “भाऊंचे प्रेम… खऱ्या प्रेमातून मिळणारा आनंद कितीही पैशाने विकत घेता येत नाही. व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.
हा व्हिडिओ युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक यूजर्स खूप भावनिक कमेंट करत आहेत. ‘सुखासाठी पैसा महत्त्वाचा नाही.’ एका यूजरने लिहिले की, ‘मोठ्या भावाचे प्रेम अमूल्य आहे आणि तो लहान भावाला खूश करण्यासाठी काहीही करू शकतो’. असे वेगवेगळे कमेंट लोकं या व्हिडिओवर करत आहेत.