या सवयी जर आज सोडल्या नाहीत तर येऊ शकतो हार्ट अटॅक

| Updated on: Feb 16, 2023 | 4:50 PM

ही समस्या केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही होत आहे. ज्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला अनेकदा या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

या सवयी जर आज सोडल्या नाहीत तर येऊ शकतो हार्ट अटॅक
heart attack
Image Credit source: Social Media
Follow us on

हल्ली हार्ट अटॅकची समस्या खूप वेगाने वाढत आहे. ही समस्या केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही होत आहे. ज्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला अनेकदा या समस्येला सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची समस्या कोणत्या कारणांमुळे होऊ शकते?

कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या गोष्टी खाणे. कोलेस्टेरॉल हा चिकट पदार्थ आहे जो हृदयासाठी खूप धोकादायक आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्त थांबते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढवण्याचे काम करणाऱ्या गोष्टींचे सेवन करू नये. यासाठी आजच आहारातून तळलेले अन्न, रेड मीट, जंक फूड वगळावे.

रक्तातील साखर वाढवणारे पदार्थ. मधुमेहाचा परिणाम केवळ मूत्रपिंडावरच नाही तर मज्जातंतूंवरही होतो. मिठाई कमीत कमी खायला हवी.

व्यायाम न करण्याची सवय. ज्यांना व्यायाम न करण्याची सवय असते ते लवकर लठ्ठपणाचे बळी ठरतात. ज्यामुळे रक्तवाहिन्या काम करायचं थांबतात. असे झाले तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून आजच धूम्रपानाची सवय सोडली पाहिजे. कारण यामुळे हृदय आणि मज्जातंतू दोन्ही कमकुवत होतात. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)