मे महिना अद्याप आलेला नसला तरी उन्हाने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केलीये. दिवसेंदिवस आता ऊन कडक होत चाललंय. मार्च महिन्यातच कडक उन्हाने लोक त्रस्त झाले आहेत. कडक उन्हामुळे लोकांना आरोग्यविषयक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी सावध राहण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देत आहेत. हवामानातील या बदलामुळे रोगराई पसरू लागली आहे. कडक उन्हामुळे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. घराबाहेर पडताना जास्त पाणी प्यायल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो. थोडे मीठ आणि लिंबू पाण्यात मिसळून प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो.
मे आणि जून हे महिने उष्ण असतात पण यंदा हवामानात थोडा बदल झाला आहे. यंदा मार्चमध्येच उष्णतेची लाट आहे. अशा वेळी बदलते हवामान आणि तीव्र उष्णता यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा इशारा दिला जात आहे. कडक उन्हात सनबर्न ही समस्या होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हापासून स्वतःचा बचाव करा. आजकाल सूर्य थेट तोंडावर असतो. आपले तोंड चांगले झाकून ठेवा, जेणेकरून ते जळण्यापासून वाचेल.
उष्णता टाळायची असेल तर अन्नाची काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. उन्हाळा असताना चरबीयुक्त पदार्थ जास्त तेल-मसालेदार गोष्टींपासून दूर राहावे. त्याऐवजी जास्तीत जास्त कोशिंबीर खा. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि तुम्ही निरोगी राहाल. उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहता.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही)