Video : प्राध्यापकाने विद्यार्थीनीला कॅबिनमध्ये बोलवले, मागितले ‘किस’, मग तिने काय केलं…

| Updated on: May 26, 2023 | 2:43 PM

Viral Video : एक प्राध्यापक विद्यार्थीनीकडे 'किस' ची मागणी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची दखल कॉलेजच्या प्राचार्यांनी घेतली आहे. त्यांनी त्या प्राध्यापकाकडून खुलासा मागवला आहे. पोलिसांनीही चौकशी सुरु केलीय.

Video : प्राध्यापकाने विद्यार्थीनीला कॅबिनमध्ये बोलवले, मागितले किस, मग तिने काय केलं...
Follow us on

जौनपूर : गुरू आणि शिष्याच्या नात्याला तडा देणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॉलेजमधील प्राध्यापक अन् एचओडी असणाऱ्या व्यक्तीने एका पदवीधर विद्यार्थ्याकडून ‘किस’ ची मागणी केलीय. तिला सेक्स करण्याची ऑफर दिली. विद्यार्थीनीने या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवला आहे अन् तो व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओची दखल कॉलेजच्या प्राचार्यांनी अन् पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. परंतु त्या प्राध्यापकाच्या विरोधात कोणीही अजून तक्रार दिली नाही.

कुठे घडला प्रकार

हे सुद्धा वाचा

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील पूर्वांचल विद्यापीठातील महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. हे विद्यापीठ पूर्व उत्तर प्रदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या टीडी कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. केवळ जौनपूरच नाही तर जवळच्या सुलतानपूर, आझमगड, मऊ, भदोही येथील विद्यार्थीही या महाविद्यालयात शिकण्यासाठी येतात. येथील इतिहास विभागाचे विभागप्रमुख प्रोफेसर प्रदीप सिंग याचा हा व्हिडिओ आहे. तो विद्यार्थीनीशी अश्लील संभाषण करत आहेत.

विद्यार्थीनेने बनवला व्हिडिओ

प्रोफेसरचा हेतू ओळखून विद्यार्थिनीने व्हिडीओ बनवला. प्रा.प्रदीप सिंगने विद्यार्थिनीला आपल्या कॅबिनमध्ये बोलवले. त्यानंतर तिने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्याला सेक्स ऑफर करताना प्रोफेसर सांगू लागले की आता बरीच औषधे उपलब्ध आहेत, काहीही त्रास होणार नाही. तो विद्यार्थिनीकडे चुंबनाची मागणी करू लागला.

काय दिली ऑफर

प्रा.प्रदीप सिंग विद्यार्थिनीला सेक्सच्या बदल्यात बीएड आणि टीईटी करुन देण्याची ऑफर देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो विद्यार्थीनीला विचारतो की, तूने कोणाशीही संबंध ठेवू नका. फक्त माझ्यासोबत करा मग तुम्हाला हवे ते मिळेल. प्रोफेसर म्हणतात की एकदा सेक्स केल्याने काहीच होत नाही. सर्व औषधे येतात. काहीही होणार नाही. सर्व सुरक्षितपणे करेल. मग एकदाच चुंबन घेण्यास सांगतो. यावर विद्यार्थ्याने नकार दिला.

व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ कॉलेजचे प्राचार्य आलोक सिंह यांच्यापर्यंत गेला आहे. त्यांनी प्राध्यापकाकडून खुलासा मागवला आहे. कॉलेजचे प्रिन्सिपल आलोक सिंह यांनी सांगितले की, हा व्हिडिओ त्यांच्याकडेही आला आहे. याबाबत अद्याप कोणी तक्रार केली नाही.