चुकूनही असं Propose करू नका, प्लॅन फ्लॉप व्हिडीओ व्हायरल!

| Updated on: Jun 21, 2023 | 1:15 PM

प्रेमात बऱ्याच गोष्टींचा दिखावा करावा लागतो, त्याशिवाय आजकालचं प्रेम देखील अपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही. रणवीर सिंग जर दीपिकासाठी चारचौघात प्रेम व्यक्त करत असेल तर साहजिक आहे आपल्या आवडत्या कलाकारांना बघून आपल्यालाही आपल्यासोबत प्रेमात असंच काहीतरी व्हावं असं वाटणारच! आपल्याला आवडणारे कलाकार, आपल्याला वाटणारे आदर्श जे करतात आपल्यालाही अगदी तसंच आयुष्य हवंहवंसं वाटतं. मग ते प्रेम का असेना!

चुकूनही असं Propose करू नका, प्लॅन फ्लॉप व्हिडीओ व्हायरल!
How to propose
Follow us on

मुंबई: प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती असतात. पूर्वीच्या काळी असं नसायचं, आधीचे लोक जेव्हा प्रेमाबद्दल सांगतात तेव्हा ते सांगतात की आमच्यावेळी “प्रेम असणं” हीच फार मोठी गोष्ट असायची. पण आता असं नाही आता प्रेमात बऱ्याच गोष्टींचा दिखावा करावा लागतो, त्याशिवाय आजकालचं प्रेम देखील अपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही. रणवीर सिंग जर दीपिकासाठी चारचौघात प्रेम व्यक्त करत असेल तर साहजिक आहे आपल्या आवडत्या कलाकारांना बघून आपल्यालाही आपल्यासोबत प्रेमात असंच काहीतरी व्हावं असं वाटणारच! आपल्याला आवडणारे कलाकार, आपल्याला वाटणारे आदर्श जे करतात आपल्यालाही अगदी तसंच आयुष्य हवंहवंसं वाटतं. मग ते प्रेम का असेना! आता तर ते हॉलिवूड बॉलिवूड चित्रपटांमुळे आणखी एक फॅड आलंय, खाली बसून प्रपोज करायचं!

प्रपोज करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमध्ये असणारी सगळ्यात लोकप्रिय पद्धत ही! एखादी डायमंडची आकर्षक, सुंदर अंगठी विकत घ्यायची आणि मुलाने आपल्या गर्लफ्रेंडला खाली बसून प्रपोज करायचं. मग आता एवढ्यावरच हे थांबतंय का? खाली बसून प्रपोज करायचं असतं हे तर खरंय पण बसणार कुठे? त्यातही मग वेगवेगळ्या डिमांड असतात. या डिमांड पूर्ण करता करता मुलांना नाकी नऊ येतात. विचार करा खूप कष्टाने एखाद्यानं प्रपोज करायची जागा फिक्स करावी, पैसे खर्च करावेत आणि तो प्लॅन फसला तर? बापरे यापेक्षा वाईट काही नाही. हा व्हिडीओ बघा.

हा माणूस समुद्रकिनारी बांधलेल्या लाकडी पुलावर गुडघ्यावर बसून आपल्या जोडीदाराला प्रपोज करायला जातो. प्रपोज करताना अंगठी बाहेर काढतो पण तेवढ्यात अंगठी अचानक त्याच्या हातातून खाली पडते. यानंतर तो आणि त्याची गर्लफ्रेंड प्रचंड नाराज होतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो माणूस गुडघ्यावर बसला आहे आणि त्याच्यासोबत एक लहान मूल आहे. समोर उभ्या असलेल्या आपल्या गर्लफ्रेंडला अंगठी देऊन तो लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. पण तेवढ्यात अंगठी अचानक पाण्यात पडते आणि क्षणार्धात त्याचा सगळा प्लॅन फिस्कटतो.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. @crazyclipsonly नावाच्या आयडीवर तो शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘प्रपोजल पूर्णपणे फ्लॉप’. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी ‘अंगठी महाग होती का’ असं विचारतंय, तर कुणी ‘म्हणूनच जमिनीवर प्रपोज करायचं असतं’ असं म्हणतंय.