अभिजित पोते, पुणे | 12 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची चर्चा नेहमी माध्यमांमध्ये सुरु असते. परंतु पडद्यामागे राहून गृहविभागाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांची चर्चा माध्यमांमध्ये नसते. सकाळी लवकर उठून घराबाहेर पडणाऱ्या अजित पवार यांचा संसार सुनेत्रा पवार यशस्वीपणे सांभाळत आहेत. पत्नीला नेहमी पतीचा वेळ हवा असतो, परंतु अजित पवार वेळ देऊ शकत नसतानाही कोणतीही कुरबुर त्या करत नाहीत. अजित पवार यांच्या प्रत्येक निर्णयामागे ठामपणे त्या उभ्या राहिला आणि संकटातही साथ दिली. आता सुनेत्रा पवार चर्चेत आल्या आहे त्या एका उखाण्यामुळे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भन्नाट उखाणा म्हटला आहे. पुणे येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी घेतलेल्या उखाण्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात होत आहे. पुण्यातील मंगळागौर कार्यक्रमात पती अजित पवार यांची आठवण करत सुनेत्रा पवार यांनी उखाणा घेतला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे शहरात हा कार्यक्रम भरवला होता. याच कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी उखाणा घेतला.
अजित पवार यांच्या पत्नीने घेतला उखाणा#AjitPawar pic.twitter.com/pOPnbRoLL0
— jitendra (@jitendrazavar) September 12, 2023
मंगळागौर कार्यक्रमात विवाहित महिला आपल्या पतीसाठी उखाणा घेतात. मग जेव्हा सुनेत्रा पवार यांचा नंबर आला त्यावेळी त्यांनी भन्नाट उखाणा घेतला. या उखाण्यास उपस्थित महिला श्रोत्यांनी चांगलीच दाद दिला. त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गणपतीला वाहते दुर्वा
पांडुरंगाला वाहते तुळशी
अजितरावांचे नाव घेते
राष्ट्रवादीसोबत मंगळगौरीच्या दिवशी
यावेळी हा उखाणा अजित दादांपर्यंत लाईव्ह कार्यक्रमातून पोहचल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले अन् श्रोत्यांचा टाळ्यांचा कडकडाट झाला.