पुणे: बिबट्याच्या हल्ल्याचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती उघड्यावर खाटेवर झोपलेली दिसत आहे. त्याच्या शेजारी एक कुत्राही पडलेला आहे. दरम्यान, रात्रीच्या अंधारात एक बिबट्या तिथल्या कुत्र्याला उचलून नेतो. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता ज्यांनी हे फुटेज पाहिलं ते थक्क झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार, ही घटना पुण्यातील जुन्नरमधील आहे. 15 मे रोजी मध्यरात्री 2 वाजता घडली.
2 मिनिट 40 सेकंदाच्या या फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की काही ट्रक रस्त्याच्या कडेला उभे आहेत, तर काही लोक खाटेवर उघड्यावर झोपलेले आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, खाटे जवळ एक कुत्राही झोपला आहे. दुसऱ्याच क्षणी ट्रकच्या खालून एक बिबट्या बाहेर येतो आणि कुत्र्याला जबड्यात पकडून तिथून निघून जातो. यावेळी कुत्र्याचा आरडाओरडा ऐकून खाटेवर पडलेली व्यक्ती जागी होते, पण समोर घडलेली घटना पाहून त्याला धक्काच बसतो.
What leopards in agricultural landscapes of western Maharashtra thrive on and bring them SO close to humans = अन्न आणि निवारा i.e. safe shelter in dense sugarcane fields, banana plantations etc. and free-ranging dogs as a common source of food. This leopard knew exactly what he… pic.twitter.com/43vs7kGJcN
— Neha Panchamiya (@neha_panchamiya) May 16, 2023
पुण्यातील प्राणी बचाव केंद्र असलेल्या आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक नेहा पंचमिया यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला 76 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. बिबट्याने कुत्र्याला बाजूने उचलले आणि खाटेवर पडलेल्या व्यक्तीला मात्र धक्काही लागला नाही. नशिबाने वाचला! हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.