पुणे | 3 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील दोन नवीन मार्गावर मेट्रो सुरु होऊन आता महिनाभर झाला आहे. या मेट्रोला पुणेकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्गांना महिन्याभरात पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या महिन्याभरात रोज सरासरी 65 हजार 822 जणांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. महिन्याभरात पुणे मेट्रोला 3 कोटी 7 लाख 66 हजार 481 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मेट्रोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मेट्रो सायकल प्रवासाचा हा व्हिडिओ आहे.
पुणे मेट्रोमधील सायकल प्रवासाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत एका तरुण मेट्रो स्टेशनवर सायकल घेऊन प्रवास करत असल्याचे दिसत आहे. सर्वात आधी हा तरुण सायकलवर बसून मेट्रो स्थानकावर येताना दिसतो. त्यानंतर मेट्रोच्या लिफ्टमध्ये जातो. मेट्रो स्थानकावर सुरक्षा कर्मचारी त्याची तपासणी करतात. त्यानंतर हा युवक सायकलसह मेट्रो स्थानकात प्रवेश करतो. पुढे मेट्रोमधून सायकल प्रवास सुरु होतो.
सोशल मीडियावर निकेत जगताप नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. त्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कॉमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, पुणे तेथे काय उणे, दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, मेट्रोवर आता सायकल ट्रॅक कर, आणखी एका युजरने म्हटले आहे की, मेट्रो अशी परवानगी देत असले तर चांगली सुविधा आहे. सायकलने ऑफिसला जाता येईल. एका युजरने म्हटले आहे की, सायकल घेऊन जायाची असेल तर एक्सट्रा चार्ज द्यावा लागतो. या व्हिडिओला सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत.
मेट्रोचा यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत हात दाखवल्यावर मेट्रो थांबत असल्याचे दिसत होते. यामुळे हात दाखवा आणि बस थांबवा प्रमाणे मेट्रो थांबवा, असे झाले होते….वाचा सविस्तर