पुणे: पुण्यातील एका भागात लोकांना अतिशय दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालंय. इथे एक पांढरा कावळा दिसलाय, जो लोकांना सहसा दिसत नाही. पांढरा कावळा पाहून लोक आश्चर्यचकित झालेत. काळ्या कावळ्यांच्या मधोमध असलेला हा पांढरा कावळा पाहून लोक आश्चर्यचकित झालेत. हा व्हिडिओ पुण्यातील लुल्ला नगर येथील असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ येताच प्रचंड व्हायरल झाला. या घटनेची माहिती काही स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. व्हिडिओमध्ये दिसणारा पांढरा कावळा रस्त्याच्या कडेला फिरताना दिसत होता. पण हाच जो पांढरा कावळा आहे तो वारंवार दिसतो की तो एकटाच आहे याबद्दल तर कुठलीही माहिती मिळालेली नाही.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपलं मत मांडलं आहे. काहींच्या मते ज्यांनी हे आधी पाहिलंय त्यांच्यासाठी ही सामान्य घटना आहे. पण ज्यांनी हे दृश्य पहिल्यांदा पाहिलं त्यांना धक्काच बसला. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील शिरूर परिसरात असाच एक पांढरा कावळा दिसला होता. पांढऱ्या रंगाचा हा कावळा अतिशय दुर्मिळ आहे. पक्षी तज्ज्ञांच्या मते पांढरे कावळे अतिशय दुर्मिळ असतात. सामान्यत: कावळ्याचा रंग काळा असतो, परंतु या पक्ष्याचा रंग पांढरा झाला आहे कारण त्याला बहुधा अनुवांशिक डिसऑर्डर आहे. या विकारामुळे कावळ्याचे संपूर्ण शरीर पांढऱ्या रंगाचे झाले.
क्या आपने कभी देखा है सफेद कौआ? pic.twitter.com/GkfzoHYGuR
— alkesh kushwaha (@alkesh_kushwaha) April 12, 2023
पांढरे कावळे दिसले की लोक खूप चकीत होतात. हा दुर्मिळ पक्षी त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगामुळे खूप खास मानला जातो. पक्षी तज्ज्ञांच्या मते 10 हजार कावळ्यांपैकी फक्त एकच कावळा पांढऱ्या रंगाचा असू शकतो. या विकारामुळे त्यांच्या पंखांचा आणि शरीराचा रंग पांढरा होतो. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.