या चित्रात तुम्हाला किती चेहरे दिसतायत? किमान ‘इतके’ चेहरे दिसायलाच हवेत

| Updated on: Sep 20, 2022 | 3:24 PM

या प्रसिद्ध चित्राला मेक्सिकन कलाकार, ऑक्टेवियो ओकाम्पो (Octavio Ocampo) च्या डॉन क्विक्सोट (Don Quixote) नावाने ओळखले.

या चित्रात तुम्हाला किती चेहरे दिसतायत? किमान इतके चेहरे दिसायलाच हवेत
Optical illusion Image
Image Credit source: Social Media
Follow us on

ऑप्टिकल इल्यूजन! डोक्याला ताण द्यायचा प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) . आपण लहानपणी कोडी सोडवायचो. सणासुदीला घरात सगळे एकत्र जमले की सगळे छान कोडी- कोडी खेळत बसायची. एक जण कोडं घालणार आणि लगेच बाकीचे ते सोडवत बसणार. मजा असायची! बरं ते कोडं सोडवताना पण ठराविक वेळेतच सोडावं लागायचं. आता ऑप्टिकल इल्यूजन हा असाच कोड्यासारखाच (Puzzle) पण थोडासा नवीन प्रकार आहे. खरं तर प्रकार जुना आहे पण आता याचा जास्त ट्रेंड आहे. एखादं चित्र बघायचं आणि त्यात डोकं लावायचं. ते एकच चित्र आहे की त्यात अनेक चित्र आहेत. एखाद्या चित्रात “आधी काय दिसतं” हा एक नवीन प्रकार आलाय. मग त्यावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा टाईप (Personality Type) कोणता आहे ते ठरणार. ऑप्टिकल इल्यूजनला माईंड टिझर सुद्धा म्हणतात. खूप डोकं चालवूनच हे कोडं सुटू शकतं. आता हा वरचं चित्र बघा. यात तुम्हाला एकूण किती चेहरे दिसतायत सांगा बरं…

या प्रसिद्ध चित्राला मेक्सिकन कलाकार, ऑक्टेवियो ओकाम्पो (Octavio Ocampo) च्या डॉन क्विक्सोट (Don Quixote) नावाने ओळखले जाते.

या फोटोत उत्तर शोधताना तुमचं डोकं दुखेल. खरं तर म्हणून अशा पद्धतीच्या चित्रांना ब्रेन टिझर म्हणतात. याचं योग्य उत्तर शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केलाय, पणमोजकेच हुशार लोक यशस्वी ठरले आहेत.

तुम्ही या फोटोतून जास्तीत जास्त चेहरे शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या बुद्ध्यांक पातळीची चाचणी घ्या. किती चेहरे दिसतायत?

ऑक्टेवियो ओकाम्पोच्या एकाच फोटोत संपूर्ण कथा सांगण्याची क्षमता असते. या फोटोत (पेंटिंग) तुम्हाला दोन व्यक्ती स्पष्टपणे दिसतील. पण नीट निरखून पाहिलं तर कुत्र्याचा चेहराही दिसेल आणि मित्रांनो हाच फोटो जर तुम्ही सतत पाहिलात, तर तुम्हाला एक नाही अनेक चेहरे दिसतील.

चित्राच्या वरच्या, खालच्या, डाव्या उजव्या भागात नीट बघा. निरखून पाहिल्यावर तुम्हाला या फोटोमध्ये 15 पेक्षा जास्त चेहरे सापडतील, पण हा फोटो इतका गुंतागुंतीचा आहे की लोक योग्य उत्तर देण्यास चुकतात.

यात खरं तर 15 हून अधिक चेहरे दडलेले आहेत. जर तुम्हाला या फोटोमध्ये 15 पेक्षा जास्त चेहरे (व्हायरल फोटो) सापडले असतील तर अभिनंदन तुम्ही या ब्रेन टेस्टमध्ये पास झालात. आता तुम्ही स्वतःला हुशार समजू शकता.