जेव्हा जेव्हा आपण अरब देशांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला उंटांची नक्कीच आठवण येते. आम्ही एक चित्र घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला काहीतरी शोधून सांगायचं आहे. तुम्हाला या चित्रात घोडा शोधून दाखवायचा आहे. ऑप्टिकल इल्यूजन हा एक असा खेळ आहे जो बहुधा प्रत्येकाला खेळायचा आहे हे खरे आहे, परंतु यासाठी खेळण्यासाठी मेंदूची आवश्यकता असते. सध्या एक फोटो समोर आला आहे. नुकताच हा फोटो सोशल मीडियावर समोर आला होता, तेव्हा एका युजरने लोकांना आव्हान दिले होते की, जर सर्व प्रतिभावंतांचा स्वतःवर विश्वास असेल तर या प्रश्नाचे उत्तर द्या. या फोटोमध्ये एक माणूस वाळवंटात उभा आहे. एक उंट आणि त्याचा साथीदार दिसत आहे. या चित्रात तुम्हाला घोडा शोधून दाखवायचा आहे.
या चित्रात लपलेला घोडा सहजासहजी दिसणार नाही. तो बहुधा हरवून इथपर्यंत पोहोचला असावा. गंमत म्हणजे फोटोत घोडा अशा प्रकारे लपवून ठेवण्यात आला आहे की तो दिसत नाही. ऑप्टिकल इल्युजनबद्दल बरेच काही प्रसिद्ध असले तरी खरा ऑप्टिकल भ्रम म्हणजे आपण योग्य गोष्ट किती वेगाने पकडतो.
हे चित्र अगदी सोपे आहे. तरीही आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगत आहोत. नीट पाहिलं तर चित्रात असलेल्या व्यक्तीच्या उजव्या हाताऐवजी त्या घोड्याचं डोकं आहे. या घोड्याच्या डोक्यावर केस सुद्धा दिसतायत. ज्यांना घोडा दिसत नाही, त्यांना आता तो दिसू लागला आहे, अशा पद्धतीने चित्र तयार करण्यात आले आहे. आता तुम्ही किती वेळात योग्य उत्तर शोधलं याचा अंदाज घ्या.