सोशल मीडियाच्या दुनियेत ऑप्टिकल भ्रमची एक वेगळीच क्रेझ सध्या पाहायला मिळते. लहानपणी आपण कोडी सोडवायचो आता ऑनलाइन ऑप्टिकल भ्रम सोडवावं लागतं इतकाच काय तो फरक. लोकं या कोड्यांची उत्तरं शोधण्यासाठी प्रचंड कष्ट घेतात. व्हायरल फोटोमध्ये एक आयपॅड ठेवण्यात आला आहे, जो भल्या भल्यांना सापडत नाही. केवळ एक टक्का जनतेला हा आयपॅड शोधता आलाय, असा दावा केला जात आहे. जर तुमची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण असेल, तर ती गोष्ट तुम्हाला काही सेकंदात सापडेल. या ऑप्टिकल इल्यूजनचं उत्तर शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 5 सेकंद आहेत. आपलं डोकं चालवा आणि आयपॅड शोधा.
ऑप्टिकल भ्रमाला ‘डोळ्यांची फसवणूक करणारं कोडं’ असेही म्हणतात.अशा चित्रांमध्ये ज्या छुप्या गोष्टी शोधण्याचे काम दिले जाते, खूप प्रयत्नांनंतरही लोकांना त्या गोष्टी दिसत नाहीत. हेच कारण आहे की ऑप्टिकल भ्रम बऱ्याचदा डोक्याचं दही बनवतात.
आता फक्त खाली दिलेल्या कार सीटचा फोटो बघा. दिसायला जेवढं सोपं आहे, तेवढंच ते किचकट चित्र आहे. चित्रात आयपॅडही आहे. आव्हान हे आहे की आता आपल्याला हे आयपॅड 5 सेकंदात शोधायचं आहे.
ज्यांना या कोड्याचं उत्तर सापडलेलं नाही त्यांच्यासाठी आम्ही आणखी एक फोटो शेअर करत आहोत, जिथे आम्ही लाल वर्तुळात सांगितले आहे की तो आयपॅड कुठे ठेवला आहे.