अनेकदा आपण काही लोकांना हे बोलताना ऐकले असेल की हा फक्त डोळ्यांचा खेळ आहे. ऑप्टिकल इल्यूजन्समध्येही असंच काहीसं दिसून येतं, पण तुमचं निरीक्षण कौशल्य थोडं चांगलं असायला हवं. गरुड जगातील सर्वात तीक्ष्ण दृष्टीसाठी ओळखला जातो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हा शिकारी पक्षी मानवापेक्षा आठपट चांगला पाहू शकतो. गरुडाला 500 फूट अंतरावरूनही आपले सर्वात लहान भक्ष्य पाहता येते. तुमची नजरही अशीच असेल तर तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही आणि तुम्ही प्रत्येक चॅलेंज सहज पूर्ण करू शकता.
कधीकधी आपल्या डोळ्यांना अशी सोपी गोष्ट दिसत नाही. लोकांना इंटरनेटवर ऑब्जेक्ट पझल गेम खूप आवडतो. सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या चित्रात एक बिबट्या आहे, जो लोकांना दिसत नाही.
हे चित्र पाहूनही 99 टक्के लोकांना त्यात दडलेला बिबट्या सापडत नसल्याचे बोलले जात आहे. हा फोटो @amitmehra यांच्या ट्विटरवरील अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
कित्येक मिनिटे चित्राकडे रोखून पाहिल्यानंतरही काही जणांना उत्तरावर उपाय शोधता आलेला नाही. झाडांमध्ये बिबट्या शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकीच्या जागेकडे बघत आहात.
बिबट्याला अजूनपर्यंत पाहिलंय का? तसे नसेल, तर तुम्हाला तुमचे निरीक्षण कौशल्य थोडे अधिक सुधारण्याची गरज आहे. आता झाडाभोवतीच्या झाडाझुडपांमध्ये पाहायला हवं. याचे उत्तर तुम्हाला काही सेकंदात मिळेल. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.