मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. लहानपणी आपण ही कोडी तोंडी सोडवायचो आता ही कोडी आपण ऑनलाइन सोडवतो, यालाच ऑप्टिकल इल्युजन म्हणतो. ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतात. तुम्हाला जर याचं उत्तर लवकरात लवकर शोधायचं असेल तर तुम्हाला सराव असायला हवा. रोज एक ऑप्टिकल इल्युजन सोडवलं की उत्तर कसं पटकन सापडेल. ऑप्टिकल भ्रम बघून माणसाचा गोंधळ उडतो. उत्तर शोधताना डोकं शांत, मन एकाग्र करावं लागतं. ऑप्टिकल इल्युजन मध्ये अनेक प्रकार असतात, यात कधी आपल्याला एखादा पक्षी शोधायचा असतो, कधी प्राणी शोधायचा असतो, कधी एखादा अंक तर कधी यात लपलेले चेहरे शोधायचे असतात. प्रत्येक चित्रात काहीतरी नवं चॅलेंज असतं.
हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला बेडूक शोधायचा आहे. हे चित्र पाहून सर्वात आधी तर माणूस गोंधळून जातो. तुमचा सुद्धा गोंधळ उडाला असेल नाही का? डोकं शांत ठेवा आणि याचं उत्तर तुम्हाला लगेच सापडेल. चित्रात पालापाचोळा दिसतो. या सगळ्यात बेडूक दिसणं खूप अवघड आहे. पण तुमचं निरीक्षण चांगलं असल्यास हे उत्तर लगेच सापडेल. चला तर मग उत्तर शोधूया…
तुम्हाला माहितेय ना तुम्हाला यात काय शोधायचं आहे? बेडूक! अशा चित्रांमध्ये जर एखादा प्राणी, पक्षी शोधायचा असेल तर आपल्या डोळ्यासमोर जे शोधायला सांगितलं आहे त्याचा आकार असायला हवा. म्हणजेच तुम्हाला बेडकाचा आकार माहितेय का? बेडूक कसा दिसतो माहितेय का? बेडकाचा पाठमोरा आकार माहित असला तर उत्तर शोधणं सोपं जाणार. अशा प्रकारच्या चित्रांमध्ये रंग नाही, आकार महत्त्वाचा आहे. तुम्हाला याचं उत्तर सापडलंय का? जर उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! नसेल सापडलं तर काळजी करू नका आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.