कोडे सोडवा! यात एक अंक दडलाय, सांगा बरं कोणता आहे?

| Updated on: Apr 23, 2023 | 3:09 PM

उहाळ्याच्या सुट्ट्या असल्या की आपण आपल्या आजोळी जायचो, भावंडांना भेटायचो, सगळ्यांमध्ये एकच खेळ खेळला जायचा. कोडी सोडवा! कोण जास्त हुशार आहे हे त्यावरून ठरवलं जायचं. कुणाचं कोडं सगळ्यात जास्त अवघड याचीही एक वेगळी स्पर्धा असायची. काळ बदलला, काळानुसार तंत्रज्ञान पुढे गेलं, तोंडी कोड्यांची जागा इंटरनेटवरच्या ऑप्टिकल इल्युजन्सने घेतली.

कोडे सोडवा! यात एक अंक दडलाय, सांगा बरं कोणता आहे?
spot the number
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हा इंटरनेटवरचा अत्यंत लोकप्रिय भाग आहे. लहानपणी आपण कोडी सोडवायचो. उहाळ्याच्या सुट्ट्या असल्या की आपण आपल्या आजोळी जायचो, भावंडांना भेटायचो, सगळ्यांमध्ये एकच खेळ खेळला जायचा. कोडी सोडवा! कोण जास्त हुशार आहे हे त्यावरून ठरवलं जायचं. कुणाचं कोडं सगळ्यात जास्त अवघड याचीही एक वेगळी स्पर्धा असायची. काळ बदलला, काळानुसार तंत्रज्ञान पुढे गेलं, तोंडी कोड्यांची जागा इंटरनेटवरच्या ऑप्टिकल इल्युजन्सने घेतली. आता लोक हेच सोडविण्यात बिझी असतात. कधी यात नंबर शोधावा लागतो, कधी योग्य स्पेलिंग तर कधी चित्रातलं काय सर्वात आधी दिसतं हे सांगावं लागतं. या चित्रात तुम्हाला कोणता नंबर दिसतोय हे सांगायचं आहे.

नुकताच हा फोटो डेली मेलने शेअर केला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, हे चित्र ऑनलाइन गेमिंग वेबसाइट जॅकपॉट जॉयने तयार केले आहे. चित्रात अशी रचना करण्यात आली आहे, ती भिंतीवर लटकलेली दृश्ये आहेत असे दिसते. आणि त्यात एक नंबर लपवण्यात आला आहे.

चित्रकलेच्या साहाय्याने हा नंबर तयार करण्यात आला आहे. स्वत:ला जीनियस समजत असाल तर हा नंबर शोधून दाखवा. इतकंच नाही तर आतापर्यंत फक्त 10 जणांनी योग्य उत्तर दाखवल्याचंही या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे.

योग्य उत्तर काय आहे?

जर तुम्हाला अजून उत्तर सापडले नसेल तर, या चित्रात 20 हा आकडा दडलेला आहे. नीट पाहिलं तर 20 म्हणजे 2 आणि 0 हे अंक तळाशी दिसतायत. हे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला प्रचंड डोके लावावे लागेल.

Here is the number