खाली दिलेल्या हॅन्ड बॅगचा रंग ओळखायचाय! शंभर टक्के तुम्ही चुकीचं उत्तर देणार

| Updated on: Oct 18, 2022 | 2:00 PM

काही लोक या हॅन्ड बॅग कडे पाहताना तिच्या रंगाचं आकलन , इनडोअर लायटिंग नुसार करणार. तर काही आऊट डोअर लाईट नुसार करणार आणि म्हणूनच लोक वेगवेगळे रंग पाहतात.

खाली दिलेल्या हॅन्ड बॅगचा रंग ओळखायचाय! शंभर टक्के तुम्ही चुकीचं उत्तर देणार
decode the handbag color
Image Credit source: Social Media
Follow us on

ऑप्टिकल इल्यूजन समजणे हे प्रत्येकाला शक्य नसते. कारण ज्यांच्याकडे निरीक्षण कौशल्य असतं त्यांनाच ते पटकन जमतं. यात आपले डोळे एक गोष्ट पाहतात आणि आपला मेंदू त्याला दुसरंच काहीतरी समजतो. काही ऑप्टिकल भ्रम डीकोड करणे खूप कठीण आहे. उदाहरणार्थ हँडबॅगचा हा फोटो घ्या. काही जण म्हणतात की ते निळे आहे, तर काहींना ते हिरवे आहे. होय, खरंय! तुम्हाला कोणता रंग दिसतोय?

काही लोक या हॅन्ड बॅग कडे पाहताना तिच्या रंगाचं आकलन , इनडोअर लायटिंग नुसार करणार. तर काही आऊट डोअर लाईट नुसार करणार आणि म्हणूनच लोक वेगवेगळे रंग पाहतात.

सुमारे दोन तृतीयांश 63% लोकांना हिरव्या रंगाची हँडबॅग दिसते, तर % 37 सहभागी त्याला निळ्या रंगाचे दिसतात – मग तुम्हाला काय दिसते?

ऑप्टिकल भ्रम एखाद्याचा मेंदू कसा कार्य करतो हे दाखवून देतात. ते व्यक्तिमत्त्वाचे प्रकार कसे डिकोड करतात, आपण डाव्या विचारसरणीचे / उजव्या विचारसरणीचे आहात की नाही याबद्दल बरेच दावे सुद्धा याद्वारे केले जातात.

अनेकदा ऑप्टिकल भ्रमात बऱ्याच गोष्टी लपलेल्या असतात. मग अशा वेळी आपल्याला विचारलं जातं की आधी काय दिसतंय? आधी काय दिसतंय यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा काही भाग असतो. आपल्या मेंदूला एकाच वेळी प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे खरोखर कठीण आहे.

बऱ्याचदा तर आपण याचं उत्तर काढायला गेलो की आपल्या लक्षात येतं की, “अरेच्चा हे तर आपण पाहिलंच नाही”. हा फोटो पण जरा वेगळा आहे. यात रंगाचा घोळ आहे. कुणाला यात हिरवा दिसतो, कुणाला निळा!

काहींना यात एकदम वेगळा रंग सुद्धा दिसू शकतो. पण हॅन्ड बॅगेचा हिरवा रंग दिसून येणाऱ्या लोकांची संख्या नक्कीच जास्त आहे.