आजकाल सोशल मीडियावर कोडी असणारी फोटो प्रचंड व्हायरल होतायत. ऑप्टिकल भ्रम! लोकही छान मजा करतात यातल्या प्रश्नांची उत्तरं देताना. वास्तविक या चित्रांमध्ये प्राणी, पक्षी, चेहरे किंवा कोणतीही वस्तू दडलेली असते, जी शोधण्याचे काम लोकांना दिले जाते. सांगितलेल्या गोष्टी शोधण्यासाठी तुमच्याकडे ठराविक वेळ आहे, असं म्हणून टायमर सुद्धा सेट करायला सांगितलं जातं. याशिवाय काही चित्रं आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही सांगतात. अशा प्रतिमांनाऑप्टिकल भ्रम असे म्हणतात. उदा., आपल्या डोळ्यांना फसवणारी चित्रे. ही चित्रे पाहिल्यानंतर लोकांचे डोकं चक्रावून जातं.
ऑप्टिकल भ्रमच्या प्रतिमा आपल्या डोळ्यांना फसवण्यासाठी डिझाइन केलेल्या असतात. अशा चित्रांमध्ये दडलेले रहस्य लोकांना शोधून काढायचं असतं.
या चित्रांमध्ये आपण जे पाहतो ते प्रत्यक्षात आपल्याला दिसते असे नाही. उलट हा आपल्या मनाचा एक प्रकारचा भ्रम आहे. हा गोंधळ चित्रात दिसणाऱ्या कोणत्याही वस्तूचा आकार, स्थिती, वेग, रंग इत्यादींविषयी असू शकतो.
आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट घेऊन आलो आहोत, हे एका लग्न सोहळ्यातील दृश्य आहे. लग्न करणारे वधू-वर आणि पुजारी यांच्या व्यतिरिक्त सर्व पाहुणे यात उपस्थित असतात.
पण नवरदेवाला नवरीला जी अंगठी घालायची होती, ती नवरदेवाकडून कुठेतरी हरवली आहे. तो बिचारा वारंवार आपल्या खिशात शोधण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला ते सापडत नाही.
आता या दुर्दैवी नवरदेवाला त्याची हरवलेली अंगठी शोधण्यात मदत करा बरं. पण आपल्याला ही अंगठी फक्त १० सेकंदात शोधायची आहे.
शेवटच्या क्षणी अंगठी हरवल्याने नवरदेवाच्या चेहऱ्याचा रंग उडून गेल्याचे आपण पाहू शकता. बाकी कुटुंबही खूप अस्वस्थ आहे.
चित्रात दडलेली अंगठी एव्हाना तुम्हाला सापडली असेलच. ज्यांना अजूनही ते सापडत नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. वर दिलेल्या फोटोत पहा, लाल वर्तुळात तुम्हाला ती अंगठी दिसेल.