‘ऑप्टिकल इल्युजन’ म्हणजे डोक्याला चालना देणारी चित्रे. अशा चित्रांचे गूढ उकलल्याने लोकांचे डोळे तीक्ष्ण होतात, पण मेंदूही धावतो असे संशोधनच सांगते. इतकंच नाही तर निरीक्षण कौशल्यही सुधारतं. त्यामुळेच ते सोडवताना लोकांनाही खूप मजा येते. आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक रंजक चित्र घेऊन आलो आहोत, जे तुम्हाला अगदी सामान्य वाटेल, पण त्याच्या आत काही रहस्ये दडलेली आहेत.
अनेक वेळा डोळ्यासमोर गोष्टी घडतात, पण लाख प्रयत्न करूनही त्या दिसत नाहीत. डोळ्यांच्या अशा फसवणुकीला ऑप्टिकल इल्युजन म्हणतात.
हे चित्र बघा लाकडाच्या ढिगाचा हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर शेअर करण्यात आलाय. यात तुम्हाला मांजर दिसत आहे का, अशी विचारणा केली आहे.
लपलेला प्राणी शोधण्यात बहुतेक लोक अयशस्वी ठरलेत. हे आव्हान पेलायला तुम्ही तयार आहात का? पण तुमच्याकडे फक्त 15 सेकंद आहेत. आणि तुमची वेळ सुरु होते आता…
वरील चित्रात उंच हिरवीगार झाडे आणि लाकडाचा ढिगारा दिसतो. पण जेव्हा तुम्ही त्या चित्राकडे बारकाईने पाहिलंत, तेव्हा तिथे तुम्हाला एक मांजर डुलकी घेताना दिसेल.
मात्र, मांजराचा रंग असा असतो की लोकांना ते दिसत नाही. त्यामुळेच, ऑप्टिकल इल्युजनचे नेमके उदाहरण म्हणून या चित्राचे वर्णन केले जात आहे. तसेच ९९ टक्के लोकांना मांजर शोधण्यात अपयश आल्याचेही बोलले जात आहे.
जर तुमची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण असेल, तर आतापर्यंत तुम्हाला ती मांजर सापडली असेल. त्याचबरोबर ज्या लोकांनी अजूनही मांजर पाहिलेलं नाही, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. खाली लाल वर्तुळामध्ये ती कुठे बसली आहे, हे आम्ही सांगत आहोत.