मुंबई: ऑप्टिकल इल्युजन प्रकारचे कोडे असते. हे कोडे आपण लहानपणी तोंडी सोडवायचो. समोरचा आपल्याला तोंडी कोडी घालायचा आणि आपण त्याची उत्तरे तोंडी द्यायचो. ऑप्टिकल भ्रम हा खूप किचकट प्रकार असतो. जर तुम्हाला याचं उत्तर शोधायचं असेल तर तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं. ऑप्टिकल भ्रमाचा रोज सराव केलात तर तुम्हाला ते सोडवणे सोपे जाते. अशा प्रकारच्या चित्रांमध्ये तुम्ही जे प्रथमदर्शनी पाहता तेच सत्य असतं असं नसतं, सत्य काहीतरी वेगळंच असतं. ऑप्टिकल भ्रमात अनेक प्रकार असतात. कधी तुम्हाला यात शब्द शोधावा लागतो, कधी अंक, कधी अक्षर तर कधी काय… तुम्हाला आश्चर्य वाटेल कधी-कधी तुम्हाला यात चेहरे सुद्धा शोधायला सांगतात.
आता हेच चित्र बघा, हे किती हटके आहे. या चित्रांमध्ये तुम्हाला छत्री शोधायची आहे. हे चित्र एका जंगलाचं आहे. या जंगलात झाडे, प्राणी, पक्षी सगळं दिसेल. या जंगलात मित्र मैत्रिणी फिरायला गेलेत, बहुतेक ते ट्रेकिंगला गेले असावेत. हिरव्यागार जंगलात तुम्हाला इथे छत्री दिसेल. खाली तुम्हाला स्ट्रॉबेरी दिसेल, मश्रूम दिसेल, खूप सारे प्राणी दिसतील पण छत्री काही दिसणार नाही. छत्री शोधणं हेच खरं चॅलेंज आहे. ऑप्टिकल भ्रमाचे उत्तर शोधताना तुम्हाला हे उत्तर लवकरात लवकर शोधायचं असतं.
आता तरी तुम्हाला याचं उत्तर सापडलेलं आहे का? आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं. एखाद्या कोड्याचं उत्तर शोधायचं असेल तर तुम्हाला आधी हे माहित असायला हवं की तुम्हाला शोधायचं काय आहे. तुमच्या डोक्यात जर स्पष्ट असेल की तुम्हाला काय शोधायचं आहे तर तुम्हाला उत्तर शोधणं फारच सोपं जातं. ऑप्टिकल भ्रम सोडवताना डोकं शांत, मन एकाग्र ठेवावं लागतं मग सगळं सहज शक्य आहे. आता तुम्हाला छत्रीचा आकार माहितेय? छत्री बंद केल्यावर तिचा काय आकार असतो, उघडून ठेवल्यावर तिचा काय आकार असतो तुम्हाला माहितेय? मग अशाच आकाराचं तुम्हाला चित्रात शोधायचं आहे. आम्ही उत्तर खाली देत आहोत.