मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हा किचकट प्रकार असतो. हे चित्र बघून माणूस आधी गोंधळून जातो. डोकं शांत, मन एकाग्र केलं की याचं उत्तर सापडतं. ऑप्टिकल इल्युजन आधी तोंडी सोडवली जायची, आठवतंय लहानपणी आपल्याला कुणीतरी तोंडी कोडी घालायचं आणि आपण ती कोडी सोडवयाचो. ही कोडी तेव्हाही इतकीच अवघड असायची पण या कोड्यांना एक बंधन असायचं कारण ती तोंडी असायची. आता ऑप्टिकल इल्युजन आल्यापासून याला कसलंही बंधन नाही. यात कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यात अनेक प्रकार असतात. कधी आपल्याला यात प्राणी शोधायचा असतो, कधी पक्षी, कधी एखादा शब्द तर कधी कधी चक्क यात लपलेला चेहरा शोधायचा असतो.
हे चित्र बघा, हे व्हायरल होणारं ऑप्टिकल इल्युजन जरा हटके आहे. यात आपल्या TREE हा शब्द शोधायचा आहे. या चित्रात तुम्हाला जवळपास सगळेच अल्फाबेट दिसतील. या सगळ्यामध्ये तुम्हाला TREE हा शब्द शोधून काढायचा आहे. प्रश्न तुम्हाला समजला असेल तर हेही समजून घ्या की यात वेगवेगळे अल्फाबेट आहेत, अशी एक तरी लाईन असेल जिथे TREE हा शब्द तुम्हाला दिसू शकतो. आडवी, उभी, तिरपी लाईन?
TREE चं स्पेलिंग लक्षात घ्या आणि आता पटकन तुम्हाला चित्रात हा शब्द कुठे दिसतोय का बघा. आम्ही सांगतो अशा प्रकारच्या ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर कसं शोधायचं. या चित्रात वरून-खाली, डावीकडून-उजवीकडे नीट बघा. यात कुठे तुम्हाला TREE शब्द दिसतोय का? कदाचित एखाद्या तिरप्या लाईनमध्ये सुद्धा हा शब्द असू शकतो. इतक्या सगळ्या अल्फाबेट मध्ये तुम्हाला हाच शब्द नीट शोधायचा आहे. तुमचं जर निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या कोड्यांची उत्तरे लगेच सापडू शकतात. तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन, नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.