मुंबई: साप लहान असो वा मोठा, समोर दिसला तर कोणाचीही हवा टाईट होते. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सापाच्या अंड्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, तेही पायथॉनच्या. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण एका टेबलावर ठेवलेल्या एका मोठ्या बॉक्समध्ये एक महाकाय अजगर पाहू शकता. त्याचवेळी एक व्यक्ती अजगराच्या अंड्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण पुढच्याच क्षणी अजगर अशा प्रकारे अंगावर येतो की ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. क्षणभर त्या माणसालाही काय करावं ते कळत नाही. हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. हे पाहून काही लोक म्हणतायत की, आई आपल्या मुलांना कधीच काही होऊ देत नाही.
अजगराच्या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. वापरकर्ता एका प्राणीसंग्रहालयाचा मालक आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “गेल्या 35 वर्षांपासून ते सापांची काळजी घेत आहेत, परंतु आजचा हल्ला अत्यंत घातक होता. काही सेकंदाच्या या क्लिपला आतापर्यंत 1 लाख 36 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर अनेक युजर्स आश्चर्याने कमेंट करत आहेत.
एका युजरने लिहिलं, ‘अरे भाई, ऐसा मत करो।’ हा व्हिडिओ पाहून मला हृदयविकाराचा झटका आल्यासारखे वाटतंय. तर आणखी एका युजरने लिहिलं की, “मला असं का वाटतं की तो माणूस त्या अजगराच्या पिल्लाला घेण्याचा प्रयत्न करत होता.” आणखी एका युजरने लिहिलं, ‘भाऊ, अशा प्राण्यांपासून दूर राहणंच चांगलं. कधी काय होईल हेही कळणार नाही.”